scorecardresearch

Premium

“हे गणराया! ओबीसींच्या मागण्या पूर्ण कर…”, गोंदियात देखाव्याच्या माध्यमातून साकडे

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर राज्यातील ओबीसी समाजातून तीव्र रोष व्यक्त होत आहे.

decoration Ganpati OBC Gondia
“हे गणराया! ओबीसींच्या मागण्या पूर्ण कर…”, गोंदियात देखाव्याच्या माध्यमातून साकडे (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

गोंदिया : मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर राज्यातील ओबीसी समाजातून तीव्र रोष व्यक्त होत आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याचेच पडसाद आता गणेशोत्सवातही उमटू लागले आहे.

गोंदियातील आदर्श कॉलोनी येथील रहिवासी प्राची प्रमोद गुडधे यांनी आपल्या घरी विराजमान झालेल्या गणरायाला ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण कर, असे साकडे घातले. यासाठी त्यांनी साकारलेला आकर्षक देखावा लक्षवेधक ठरत आहे.

devendra Fadnavis comment patients death
‘‘राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे…”, रुग्णालयातील मृत्युसत्राबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? वाचा…
Hasan Mushriff
“भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्री…”, हसन मुश्रीफांना भाजपा नेत्याचा टोला; म्हणाले, “कोल्हापुरात संघर्ष अटळ”
email
लोकमानस : राजकारण लांडग्यांचा खेळ झाला आहे का?
dewndra fadanvis, Statement of Devendra Fadnavis regarding Dhangar Samaj reservation in pune
धनगर समाज आरक्षण: मुख्यमंत्र्यांनी एवढी सकारात्मकता दाखवल्यावर निश्चित मार्ग निघेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा – “मी वित्तमंत्री… ओबीसींचे वसतिगृह, शिष्यवृत्तीसाठी मला भीक द्या”, ओबीसींचे अनोखे आंदोलन

हेही वाचा – अकोल्यात ‘लम्पी’ प्रादुर्भावात सातत्याने वाढ; १० कि. मी. क्षेत्रामध्ये…

या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, इतर काही निर्माण करण्यापेक्षा ओबीसींच्या मुद्यावर देखावा तयार करण्याची संकल्पना त्यांना सुचली आणि ती त्यांनी साकारसुद्धा केली. सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जातीनिहाय जनगणना, ओबीसींचे वसतिगृह, ओबीसींच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवावी तसेच पोलीस पाटील भरतीत ओबीसी समाजावर झालेला अन्याय, अशा विविध मागण्यांकडे देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The demands of obc were expressed through the decoration of ganpati in gondia sar 75 ssb

First published on: 21-09-2023 at 13:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×