अकोला : संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे राजराजेश्वरनगरी दोन दिवसांपासून भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे. भगव्या पताका, अश्व, दिंडी,‎ टाळ-मृदंगाचा गजर, ७०० वारकरी, मुखी हरिनामामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ‘श्रीं’च्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संत नगरी शेगाव येथून विठूमाऊलींची भेट घेण्यासाठी ‘श्रीं’ची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली. पालखी सोहळ्याचे यंदाचे ५४ वे वर्ष आहे. ‘श्रीं’च्या पालखीचे अकोला शहरात ठिकठिकाणी‎ भक्तिभावात स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळीने सजावट करण्यात आली. वारकऱ्यांना अनेक ठिकाणी प्रसाद, थंडपेय व विविध साहित्यांचे वाटप केले. मार्गामध्ये पालखीपुढे हजारो भाविक नतमस्तक झाले.‎ ‘विठ्ठल माझा.. विठ्ठल माझा..मी‎ विठ्ठलाचा’, जय हरी विठ्ठल, गण गण‎ गणात बोते, पांडुरंग हरी माऊली, ‘श्री गजानन, जय गजानन…’ आदी जयघोषाने शहर दुमदुमले आहे.‎ रविवारी रात्री मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात पालखी‎चा मुक्काम होता. याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The devotional atmosphere the palkhi ceremony devotees darshan ppd 88 ysh
First published on: 29-05-2023 at 15:03 IST