Premium

विदर्भातील पहिले क्रीडा भौतिकोपचार केंद्र सुरू, कोणत्या सुविधा मिळणार, जाणून घ्या…

सावंगी येथील मेघे विद्यापीठाच्या रवी नायर भौतिकोपचार महाविद्यालयात अश्या उपचारासाठी क्रीडा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

The first sports physiotherapy center in Vidarbha
विदर्भातील पहिले क्रीडा भौतिकोपचार केंद्र सुरू

वर्धा : ग्रामीण तसेच काही मोठ्या शहरात सुध्धा जखमी झालेल्या खेळाडूस योग्य ते उपचार देण्याची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी जायबंदी झालेला खेळाडू पुढे खेळ खेळण्यास अपात्र ठरतो. ही उणीव हेरून सावंगी येथील मेघे विद्यापीठाच्या रवी नायर भौतिकोपचार महाविद्यालयात अश्या उपचारासाठी क्रीडा केंद्र सुरू करण्यात आले आहे. क्रीडापटूंचे कौशल्य विकसित करणे,शारीरिक क्षमता व गुणवत्ता वाढविणे,कार्याचे शास्त्रीय मूल्यांकन,खेळाशी निगडित स्वास्थसेवा तसेच अस्थी व स्नायुशी संबंधित दुखापतीवरील अद्यावत उपचार करण्याचे काम येथील तज्ञ करतील,अशी माहिती प्राचार्य डॉ.इर्शाद कुरेशी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्य सल्लागार सागर मेघे यांनी या केंद्रासाठी एर्गो मीटर,लेसर अल्ट्रा साऊंड थेरेपी, न्यूरो मस्कुलर, प्लेयो मेट्रिक्स, इलेक्ट्रॉथेरेपी असे व अन्य अत्यधूनिक यंत्रणा उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले. या केंद्रात क्रीडापटूंना शारीरिक बळ, कार्यक्षमता, चपळता, संतुलन, सहनशीलता या बाबींचे प्रशिक्षण मिळेल.आरोग्य व्यवस्थापनावर भर देणार.व्हॉलीबॉल,हँडबॉल,बॅडमिंटन,कबड्डी,क्रिकेट या खेळांच्या संघटनांशी सामंजस्य करार करण्यात आले आहे.दीडशे क्रीडापटूंचा सहभाग लाभलेले शिबिर संपन्न झाले.दुखापत झालेल्या अंशी खेळाडूंना फिटनेसचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे तज्ञ प्रशिक्षक डॉ.स्वप्नील रामटेके म्हणाले.शिबिरातील मुलामुलींची चमू पश्चिम बंगाल येथील हुबळीत आयोजित राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.अश्या सर्व सोयी व प्रशिक्षणाचे हे विदर्भातील पहिलेच केंद्र असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The first sports physiotherapy center in vidarbha will be started pmd 64 ysh