scorecardresearch

Premium

पूर ओसरला, वेदना कायम! नागपुरातील सध्याची स्थिती काय? जाणून घ्या…

सध्या पूर ओसरला असला तरी पूरग्रस्तांच्या वेदना मात्र कायम आहेत. या स्थितीला जबाबदार कोण यावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

flood in Nagpur city
पूर ओसरला, वेदना कायम! नागपुरातील सध्याची स्थिती काय?जाणून घ्या… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलावातून पाण्याचा मोठा विसर्ग झाला. पूरपरिस्थिती निर्माण होऊन पाचजणांचे बळी गेले आणि कोट्यवधींचे नुकसान झाले. सोमवारपर्यंत पूरग्रस्त सावरले नव्हते. सध्या पूर ओसरला असला तरी पूरग्रस्तांच्या वेदना मात्र कायम आहेत. या स्थितीला जबाबदार कोण यावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

हेही वाचा – श्शु… ‘टायगर जिंदा हैं!’ नव्या ‘टायगर’च्या आगमनाने गावात सामसूम; दहशत अशी की…

atul save visit rss office
ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…
lokmanas
लोकमानस: ही हुकूमशाहीकडे वाटचाल तर नव्हे?
sharad pawar remark against Fascist forces
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय अस्थिरता…’
Harish Tulsakar
पटोलेंच्या कार्यप्रणालीवर गृहजिल्ह्यातील कॉग्रेस जिल्हाध्यक्षच नाराज

हेही वाचा – अंत्ययात्रेत आले अन तिरडी सोडून नातेवाईकांनी नदीत मारल्या उड्या! जाणून घ्या नेमके काय घडले…

पूरग्रस्त वस्त्यांचा सोमवारी फेरफटका मारला असता येथील नागरिक अद्याप पुराच्या धक्क्यातून सावरलेले नसल्याचे दिसून आले. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने इलेक्ट्रिक वस्तू, सोफा सेट, गादी, वस्रे खराब झाली होती. चारचाकी, दुचाकी नादुरुस्त झाल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या कारवर गादी वाळत टाकली होती. बहुतांश घरात चिखल, माती साचली होती. ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात अंबाझरी लेआऊटमधील एका उपाहारगृहाचे संचालक शुभम म्हणाले की, त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये पाच फूट पाणी साचले होते. सर्व वस्तू खराब झाल्या आहेत. कॉफी बनवण्याची साडेतीन लाख रुपयांची मशीन निकामी झाली आहे. याशिवाय फ्रीज आणि इतर वस्तूही खराब झाल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The flood in nagpur city receded what is the current status find out rbt 74 ssb

First published on: 26-09-2023 at 14:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×