scorecardresearch

अन् माजी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले, जाणून घ्या कारण…

जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. यामध्ये विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, सुनील केदार यांच्यासह अनेक नेते होते.

The district collector was furious
माजी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले

नागपूर : जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. यामध्ये विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, सुनील केदार यांच्यासह अनेक नेते होते. या सर्व नेत्यांना पोलीस व्हॅनमधून वाहतूक शाखा कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. यावर पोलिसांच्या गाडीतून आरोपी प्रमाणे का नेण्यात आले, असा प्रश्न सुनील केदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. त्यावर केदार यांनी संताप व्यक्त केला.

वडेट्टीवार यांनीही या वादात उडी घेतली. पोलिसांच्या वाहनातून आम्हाला आणण्यात आले. हे बघून जनतेचा उद्रेक झाला असता तर त्याला जबाबदार कोण असते, असा सवाल केला. हा वाद वाढत असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यानी हस्तक्षेप करीत ज्यांनी कोणी पोलिसांच्या वाहनातून आणण्याचे आदेश दिले त्यांना समज द्या, असे सूचवले. त्यावर केदार यांनी हात जोडून देशमुख यांना नमस्कार केला आणि विषय संपवला.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 21:08 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×