चंद्रपूर : न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच तरुणीने घेतला गळफास; आत्महत्या की घातपात?|the girl hanged herself at the entrance of the bramhpuri new court in chandrapur | Loksatta

चंद्रपूर: न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच तरुणीने घेतला गळफास; आत्महत्या की घातपात?

तरुणीने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

चंद्रपूर: न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच तरुणीने घेतला गळफास; आत्महत्या की घातपात?
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

ब्रम्हपुरी येथील नवीन न्यायालयाच्या प्रवेश द्वारावर एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. आज, मंगळवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात? याबाबत विविध तर्क लावले जात आहे.

पौर्णिमा मिलिंद लाडे (२७), असे मृत तरुणीचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी ब्रम्हपुरी येथे आली होती. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ती तालुका न्यायालय इमारतीच्या लोखंडी प्रवेश द्वारावर गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तिने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याची माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणाची दखल ब्रम्हपुरी पोलिसांनी घेतली आहे. ही आत्महत्या की घातपात याचाही शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:19 IST
Next Story
भयानक ! मुलीचा शिक्षणखर्च परवडेना,खर्च भागवण्यासाठी गरीबीचा फायदा घेत दुसऱ्याच्या मुलीला ढकलले वेश्याव्यवसायात