नवीन सोन्याचे दुकान सुरू करायचे आहे. त्यामुळे तुमच्या हातातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने काढून शंभर रुपयाच्या नोटात गुंडाळून देवासमोर ठेवा. त्यामुळे माझे दुकान चांगले चालेल. अशी बतावणी करून अंदाजे दोन लाख रुपयाचे दागिने लंपास केल्याची घटना २२ मार्च रोजी शहरातील राम मंदिर येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>चंद्रपूर: ‘वाचाल तर वाचाल’, नवरगाव येथे विदर्भातील पहिली वाचन संस्कृती कार्यशाळा

लक्ष्मी गोपाल देवयानी यांनी पोलिसात फिर्याद दिली की, नेहमीप्रमाणे सिंधी कॅम्प येथील राम मंदिरात दर्शनासाठी गेले असता, मंदिरात एका अज्ञात व्यक्तीने अडवून मला नवीन दुकान सुरू करायचे आहे. तुमच्या गळ्यातील आणि हातातील दागिने शंभर रुपयाच्या नोटात गुंडाळून देवासमोर ठेवा. त्यामुळे माझ्या दुकानाला लाभ होईल. त्यानुसार गळ्यातील आणि हातातील सोन्याचे दागिने शंभर रुपयाच्या नोटात देवासमोर ठेवले. थोड्या वेळाने ते बघितले असते त्यामध्ये सोन्याचे दागिने नव्हते. त्यानंतर तो व्यक्तीही आढळून न आल्याने पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऐन सणाच्या दिवशी ही घटना घडली असल्याने शहरात एकच खळबळ उडाली. आता चोरट्यांना देवाचाही धाक उरला नाही की काय अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The gold ornaments from the woman neck were stolen washim pbk 85 amy
First published on: 23-03-2023 at 18:19 IST