राज्‍यात सरकारच अस्तित्‍वात नाही, अशी स्थिती असून पालकमंत्र्यांकडे पाच-सहा जिल्‍हे सोपविण्‍यात आले आहेत. ही लोकशाहीची थट्टा आहे. पालकमंत्र्यांना ‘स्‍पायडर मॅन’सारखे फिरावे लागेल, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी येथे केली.कॉंग्रेसच्‍या वतीने आयोजित अल्‍पसंख्‍यांक संमेलनाला उपस्थित राहण्‍यासाठी नाना पटोले रविवारी अमरावतीत आले आहेत. तत्‍पुर्वी येथील जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयाच्‍या शिशू कक्षाला आग लागल्‍याची माहिती मिळताच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्‍यासमवेत ते जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयात पोहचले. यावेळी प्रसार माध्‍यमांशी बोलताना नाना पटोले यांनी राज्‍य सरकारवर टीका केली.

हेही वाचा >>> ‘रिफायनरी’बाबत साशंकता; उद्योजक आग्रही तर पर्यावरणवादी विरोधात

सध्‍या राज्‍यात सरकारच नाही, अशी परिस्थिती आहे. आतापर्यंत राज्‍यात पालकमंत्रीच नव्‍हते. काल अखेर पालकमंत्री जाहीर करण्‍यात आले. एका मंत्र्याकडे पाच’सहा जिल्‍हे सोपविण्‍यात आले आहेत. पालकमंत्र्यांना ‘स्‍पायडर मॅन’ सारखे इकडून तिकडे फिरावे लागेल. खरे तर ही लोकशाहीची एक प्रकारे थट्टाच आहे, असे नाना पटोले म्‍हणाले.जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयातील शिशू दक्षता कक्षाला आग लागल्‍यानंतर येथील प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्‍याने मोठा अनर्थ टळला असला, अशा घटना रोखण्‍यासाठी तातडीने उपाययोजना करण्‍याची गरज आहे. भंडारा येथील आगीच्‍या भीषण घटनेनंतरही त्‍यातून आपण धडा घेतलेला नाही. अनेक रुग्‍णालयांमध्‍ये सुरक्षितता अपुरी आहे. सरकारचे त्‍याकडे दुर्लक्ष आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.