भंगार एसटी बसच्या धारधार पत्र्याने अग्निवीर भरतीसाठी रस्त्याच्या बाजूला व्यायाम करणाऱ्या दोघा युवकांचे हात कापले गेले. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मलकापूर बस स्थानकात तोडफोड केली. यात स्थानक प्रमुख बालंबाल बचावल्याचे प्राथमिक वृत्त आहे.मलकापूर – पिंपळगाव देवी मार्गावर आव्हाजवळ आज शुक्रवारी सकाळी काही तरुण रस्त्याच्या कडेला भरतीसाठी व्यायाम करीत होते. दरम्यान, याच मार्गावरून मलकापूर आगाराची बस जात असताना चालकाच्या मागील बाजूच्या तुटून बाहेर आलेल्या पत्र्याने दोन तरुणांचे हात कापले गेले.

हेही वाचा >>>नागपूर : हत्ती स्थलांतरावर पुढील आठवड्यात सुनावणी

अपघात इतका भीषण आहे की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून पडले. विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असे या दोन्ही तरुणांचे नाव असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव रुग्णालयात हलविल्याचे माहिती आहे. बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली . सकाळी साडेपाच वाजता सुटणाऱ्या मलकापूर आगाराच्या या बसने आधी दुधलगाव येथे मलकापूर कडे येणाऱ्या दुचाकी स्वाराला जखमी केले. जखमी ची संख्या ३ असल्याचे व त्यात एका शेतकऱ्याचा समावेश असल्याचे समजते. मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही.

हेही वाचा >>> वाशीम : भल्या पहाटे काळाने साधला डाव! ; उभ्या ट्रकला इनोवा धडकली, दोघे जागीच ठार

आगारात तोडफोड, प्रमुख पळाले
या घटनेचा रोष व्यक्त करित काही जनांनी थेट मलकापूर येथील आगार प्रमुखाच्या कक्षात जाऊन तोडफोड केली. आगार प्रमुख दराडे यांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आगार प्रमुख यांच्या कक्षाची पाहणी केली.