रवींद्र जुनारकर
पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर वेळीच योग्य ती कारवाई करून पक्षाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रदेश काँग्रेस समितीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय शिस्तभंग समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी
जिल्हा व ब्लॉक स्तरावरील स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक वेळा प्रसार माध्यमांच्या समोर वरिष्ठ नेत्यांच्या व पक्षाच्या विरोधात वक्तव्य करत असतात, स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतात. तसेच बॅनर, पोस्टर इत्यादींबाबतही राजशिष्ठाचार पाळले जात नसल्याची अनेक प्रकरणे प्रदेश काँग्रेस कार्यालयास प्राप्त झाली आहेत. या सर्व बाबी अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत. पक्षविरोधी भूमीका घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर वेळीच योग्य ती कारवाई न झाल्यास पक्षाचे फार मोठे नुकसान होऊ शकते ही शक्यता लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे.
हेही वाचा >>>खळबळजनक! मठातील दोन जेष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या
या करीता जिल्हास्तरीय शिस्तभंग समिती गठित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. जिल्हास्तरीय शिस्तभंग समिती मध्ये जिल्हा प्रभारी तथा जिल्हा सहप्रभारी मानद सदस्य राहतील तर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष पदसिध्द अध्यक्ष असतील. विद्यमान खासदार किंवा लोकसभा निवडणूक २०१९ मधील पक्षाचा उमेदवार, विद्यमान आमदार किंवा विधानसभा निवडणूक २०१९ मधील पक्षाचा उमेदवार (संबधित विधानसभा क्षेत्रा करीता) समितीचा सदस्य राहील. जिल्हा परिषद अध्यक्ष / उपाध्यक्ष / गटनेता, महानगरपालिका महापौर / उपमहापौर / विरोधी पक्षनेता / गटनेता यांचाही या समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>वर्धा: उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आता ‘स्वयंसेवीं’ची ‘महाभारत’ यात्रा
जिल्हास्तरीय शिस्तभंग समितीने आपल्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षीय कामकाज व पक्षवाढी विरोधात कोणतेही गैरवर्तन केल्यास त्यांना शिस्तभंग समितीच्या अध्यक्षाने रितसर नोटीस देऊन ७ दिवसांच्या आत खुलासा मागवावा. खुलासा समाधानकारक नसल्यास समितीची तातडीने बैठक बोलावून सदर व्यक्तीच्या गैरवर्तनासंदर्भात शिस्तभंग कारवाई बाबतचा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी प्रदेश कार्यालयास पाठवावा असेही निर्देश दिले आहेत. काँग्रेसचे राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस समिती शहर / ग्रामीण यांना प्रदेश काँग्रेस समितीचे संघटन व प्रशासन विभागाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी लेखी पत्र पाठवून ही शिस्तभंग समिती तत्काळ गठीत करा असे सांगितले आहे.