अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीसाठी आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यातील संथ गतीनंतर दुसऱ्या टप्प्यात मात्र मतदानाची गती वाढल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नागपूर शिक्षक मतदार संघात दोन तासात १३.५७ टक्के मतदान

सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान जिल्ह्यात सरासरी १७.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. आज सोमवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्यातील ५२ केंद्रावरून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात ६.३८ टक्के मतदानाची नोंद झाली. परिवारातील सदस्यांनी औक्षण केल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी स्थानिय एडेड शाळेतील केंद्रावर मतदान केले. जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १७.८९ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.

हेही वाचा >>>अमरावती पदवीधर मतदार संघात सकाळच्‍या सत्रात संथ गतीने मतदान, १० वाजेपर्यंत ५.४९ टक्‍के मतदानाची नोंद

मलकापूर मधील तीन केंद्रावर २३ ते २९ टक्के दरम्यान उत्साही मतदान झाले.जळगाव जामोद मधील तीन केंद्रावर २१ टक्के मतदानाची नोंद झाली. ३७ हजार ८९४ पैकी ६७७९ मतदारांनी दुपारी बारापर्यंत मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १३८१ महिलांचा समावेश होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The leading candidate dheeraj lingade voted in the first phase itself scm 61 amy
First published on: 30-01-2023 at 13:33 IST