scorecardresearch

Premium

चंद्रपूर : बंदुकबाज जेरबंद, गणेशोत्सवात दुसरी कारवाई

गणेशोत्सव काळात घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. अमर रमेश आत्राम (१९, रा. कोहपरा ता. राजुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

youth carrying gun arrested chandrapur
चंद्रपूर : बंदुकबाज जेरबंद, गणेशोत्सवात दुसरी कारवाई (image – pixabay/representational image)

चंद्रपूर : गणेशोत्सव काळात घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. अमर रमेश आत्राम (१९, रा. कोहपरा ता. राजुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शस्त्र जप्त करण्याची तीन दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे.

गणेश उत्सवादरम्यान समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ‘भयमुक्त गणेश उत्सव’ संकल्पनेतून पोलीस अधीक्षकांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते. अमर आत्राम हा युवक आपल्या घरी अवैध अग्निशस्त्र लपवून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. युवकाच्या घरी छापा टाकून झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व मोबाईल असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ganesh ustav to jai shree ram
बाप्पा मोरया ते जय श्रीराम!
Lalbaugcha Raja Visarjan 2023
Lalbaugcha Raja Visarjan 2023 : लालबागच्या राजाचं अखेर २३ तासांनी विसर्जन, अत्याधुनिक तराफ्यातून बाप्पाला निरोप; पाहा VIDEO
Navi Mumbai Municipal Commissioner Rajesh Narvekar went to the reservoir for ganesh immersion
नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर स्वतः तराफ्यावरून जलाशयात उतरले, स्वयंसेवकांचा उत्साह द्विगुणित
Nirmalya vehicle Wardha
वर्धा : निर्माल्याचे पावित्र्य जपावे म्हणून स्वतंत्र निर्माल्य वाहन, शिवमंदिर भगिनी मंडळाचा पुढाकार

हेही वाचा – नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! सर्वाधिक फटका मध्य नागपूरला; पंचशील चौक परिसरातील अनेक रुग्णालयांमध्ये पाणी

हेही वाचा – शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे…

आरोपीविरुद्ध विरूर स्टे येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी राजुरा येथे राजरतन राहुल बनकर याच्याकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काळतुस जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक अतुल विनायक कावळे, अनुप डागे, जमिर पठाण, नितेश महात्मे, मिलिंद चव्हाण, प्रसाद धुळगंडे, दिनेश अराडे आदींनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The local crime branch arrested a youth who was illegally carrying gun at home during ganesh utsav rsj 74 ssb

First published on: 23-09-2023 at 12:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×