वीज दरवाढीचा शॉक! ग्राहकांवर वीज वापरासाठी किती पडणार भुर्दंड जाणून घ्या..

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने एप्रिल-२०२३ पासून वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे.

electricity tariff hike
वीज दरवाढीचा शॉक! ग्राहकांवर वीज वापरासाठी किती पडणार भुर्दंड जाणून घ्या.. (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने एप्रिल-२०२३ पासून वीज दरवाढीला मंजुरी दिल्याने घरगुती ग्राहकाला ३० युनिटसाठी महिन्याला ११ रुपये, तर ३०० युनिट वापरासाठी ५२२ रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. पुढच्या वर्षी आणखी दरवाढीने ग्राहकांवर अतिरिक्त भार पडेल.

मुंबईचा काही भाग वगळून राज्यातील बहुतांश भागात महावितरणकडून वीज महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजूर केलेल्या दरवाढीनुसार, महावितरणच्या घरगुती संवर्गातील ३० युनिट वापरणाऱ्याला १ एप्रिल २०२२ मध्ये २४६.३० रुपये देयक येत होते. ते आता २८३.४० रुपये आणि पुढच्या वर्षी १ एप्रिल २०२४ पासून ३०४.४० रुपयांचे असेल.

हेही वाचा – आजी-माजी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांमध्ये खडाजंगी; वनसंवर्धन दुरुस्ती विधेयकावरून मतभेद

५० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकाला पूर्वी ३४०.५० रुपये देयक यायचे. ते आता ५४.५० रुपयांनी वाढून ३९५ रुपये, तर पुढच्या वर्षी ४२२ रुपये येईल. १०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकाला पूर्वी ५७६ रुपये देयक येत होते. ते आता ९८ रुपयांनी वाढून ६७४ रुपये आणि पुढच्या वर्षी ७१६ रुपये येईल. २०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकाला पूर्वी १ हजार ४४५ रुपये देयक येत होते. ते आता ३१० रुपये वाढून १ हजार ७५५ रुपये आणि पुढच्या वर्षी १ हजार ८६२ रुपये येईल. ५०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकाला पूर्वी ४ हजार ६५८ रुपये देयक येत होते. ते आता १ हजार १३४ रुपयांनी वाढून ५ हजार ७९२ रुपये आणि पूढच्या वर्षी ६ हजार १५२ रुपये येईल. ७०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकाला पूर्वी ७ हजार ३०० रुपये देयक येत होते. ते आता १ हजार ८४० रुपयांनी वाढून ९ हजार १४० रुपये आणि आता ९ हजार ७१४ रुपये येईल. २५०० युनिट वीज वापरणाऱ्यांना पूर्वी ३१ हजार ७८ रुपयांचे देयक येत होते. आता ते ८ हजार १९४ रुपयांनी वाढून ३९ हजार २७२ रुपये आणि पुढच्या वर्षी ४१ हजार ७७२ रुपये येणार आहे.

व्यावसायिक ग्राहकांची दरवाढ जास्त

व्यावसायिक ग्राहकांना ३० युनिटसाठी पूर्वी (१ एप्रिल २०२२) ६७९ रुपये देयक येत होते. ७३.६० रुपये दरवाढीमुळे आता देयक ७५३.२० रुपये आणि पुढच्या वर्षी (१ एप्रिल २०२४) ८०७ रुपये देयक येईल. ५० युनिट वापर असलेल्यांना पूर्वी ८४८ रुपये देयक येत होते. ते ९४ रुपये दरवाढीने ९४२ रुपये आणि पुढच्या वर्षी १ हजार १ रुपये येईल. १०० युनिट वापर असलेल्यांना पूर्वी १ हजार २६९ रुपये देयक येत होते. ते १४५ रुपये दरवाढीमुळे १ हजार ४१४ रुपये आणि पुढच्या वर्षी १ हजार ४८६ रुपये येईल. ३०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांना पूर्वी २ हजार ९५३ रुपये देयक येत होते. ते ३४९ रुपये दरवाढीमुळे ३ हजार ३०२ रुपये आणि पुढच्या वर्षी ३ हजार ४२४ रुपये येईल.

हेही वाचा – वर्धा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार

“एमईआरसीने मंजूर केलेली दरवाढ गेल्यावेळच्या वीज दराच्या तुलनेत ० ते २,५०० युनिट वापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी १०.४८ टक्के ते २६.३७ टक्के आहे. ० ते २,५०० युनिट वीज वापर असलेल्या वाणिज्यिक ग्राहकांसाठी १०.०७ टक्के ते १२.०७ टक्के आहे. त्यातच उन्हाळ्यात बाहेरून वीज खरेदीसह इतर वाढणाऱ्या खर्चापोटीच्या इंधन अधिभाराचा समावेश यात नाही. हा खर्च ग्राहकांवर अतिरिक्त बसणार आहे.” असे वीज क्षेत्राचे जाणाकार महेंद्र जिचकार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:57 IST
Next Story
वर्धा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार
Exit mobile version