scorecardresearch

अकोला: महादेव-पार्वतींच्या लग्न सोहळ्याचा उत्साह; आदिवासी कोळी महादेव समाजाची शेकडो वर्षांची परंपरा

जेवणावळी, देवकुंडी, वरात, वाजंत्री, पाहुण्यांची लगबग, वधू वराकडील मान सन्मानाचा विधी, मंगलाष्टके अशा पारंपरिक पद्धतीने देवाधिदेव महादेव व माता पार्वती यांच्या लग्न सोहळा अकोट तालुक्यातील रेल येथे उत्साहात पार पडला.

Mahadev Parvati god marriage ceremony
आदिवासी कोळी महादेव समाजाची शेकडो वर्षांची परंपरा आजही भक्तिभावाने जोपासली जाते.

जेवणावळी, देवकुंडी, वरात, वाजंत्री, पाहुण्यांची लगबग, वधू वराकडील मान सन्मानाचा विधी, मंगलाष्टके अशा पारंपरिक पद्धतीने देवाधिदेव महादेव व माता पार्वती यांच्या लग्न सोहळा अकोट तालुक्यातील रेल येथे उत्साहात पार पडला. आदिवासी कोळी महादेव समाजाची शेकडो वर्षांची परंपरा आजही भक्तिभावाने जोपासली जाते.

हेही वाचा >>>वाशीम: बंजारा ब्रिगेडने फुंकले पोहरादेवीतून राजकीय रणशिंग; रामनवमी निमित्त पोहरादेवीत उसळला जनसागर

महादेव आणि पार्वती या देवांच्या लग्न सोहळ्याची लगबग रेल गावात पाहायला मिळाली. वर व वधू कडील पाहुणे मंडळी या गावात सकाळपासूनच हजेरी लावत होती. वाजंत्री, मंगलाष्टके सारे काही एखाद्या खऱ्याखुऱ्या लग्नासारखे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. हा लग्नसोहळा साजरा करण्याची परंपरा या गावत शेकडो वर्षापासून स्थानिक आदिवासी कोळी जमातीच्या लोकांनी जोपासली आहे. हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देवाधिदेव महादेव व माता पार्वती यांचे परंपरेप्रमाणे लग्न लावण्यात आले. या लग्न सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अकोला पुर्वचे आमदार व भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, तर दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, युवा उद्योजक दादाराव पेठे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. यावेळी गोपाल पेठे, उद्योजक विनोद मंगळे, राजू नागमते, डॉ. दिव्या पेठे , करतवाडी रेल्वे सरपंच शितल रुपेश पेटे, मंगल पेठे आदींसह परिसरातील गावकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 15:28 IST

संबंधित बातम्या