नागपूर : मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरण सध्या गाजत आहे. मंगळवारी गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण  गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. तपास अधिकाऱ्यांनी त्यांची तब्बल पाच तास  चौकशी  केली. गोळी कशी झाडली? या बाबत माहिती नाही, असे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुढ वाढले आहे.मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांचा फोन आल्याने घटनास्थळी गेलो. दोघांनी मिळून गायवाड यांना रूग्णालयात दाखल केले, असे चव्हाण यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी गुन्हे शाखेने संकेत गायकवाड, त्यांची पत्नी कोमल गायकवाड, निरीक्षक गीता शेजवळ आणि विरसेन ढवळे यांना चौकशीसाठी  नोटीस पाठवली  होती. मात्र, ढवळे आणि एका साक्षीदारा व्यतिरीक्त कोणीही चौकशीसाठी उपस्थित झाले नाही. आता गुन्हे शाखेने आरोपी निश्चित केल्याने विजय चव्हाण मंगळवारी सकाळी ११ वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ ते २ आणि सायंकाळी ४ ते ६ यावेळेत त्यांचे जबाब नोंदविण्यात आले.

हेही वाचा >>>लोकजागर: कौल कुणाला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व्हिस रिव्हॉल्वर मधूनच गोळी सुटल्याची घटना ७ मे २०२२ ला गायकवाड यांच्या निवासस्थानी सकाळी ६.३० ते ७ वाजेदरम्यान घडली होती. या प्रकरणी बजानगर पोलिसांनी गायकवाड यांचे जबाब नोंदविले. सोबतच कार्यालयातील सहकारी मोटार वाहन निरीक्षक यांचे बयाण नोंदवून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले. दरम्यान न्यायसहायक वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालावरून बजाजनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा नोंदविला होता. यानंतर गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याने साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे, त्यांच्या जबाबातील तफावत आणि डॉक्टरांच्या अभिप्रायावरून संकेत गायकवाड आणि गीता शेजवळ यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला व आरोपीही निश्चित केले.

 शेजवळ यांना जामीन नाकारला

मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी मंगळवारी न्यायालयाने गीता शेजवळ यांना जामीन नाकारला. शेजवळ आणि गायकवाड यांनी गुन्हे शाखेकडे न जाता जामिनासाठी न्यायालयाकडे धाव घेतली होती. न्यायालयाने यावर सुनावणी घेऊन निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी न्यायालयाने गायकवाड यांचा जामिन मंजूर केला तर शेजवळ यांना जामीन नाकारला. पोलिसांचे एक पथक शेजवळ यांच्या शोधासाठी राज्यात आणि राज्याबाहेरही गेले आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास गुन्हे शाखेला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mystery of firing on the motor vehicle inspector increased nagpur adk 83 amy
First published on: 25-01-2024 at 01:19 IST