राज्यात मजबूत विरोधी पक्षाची गरज; सुषमा अंधारेंचे वक्तव्य| the need for a strong opposition party in the state statement of sushma andhare mahaprabodhan yatra gondiya | Loksatta

राज्यात मजबूत विरोधी पक्षाची गरज; सुषमा अंधारेंचे वक्तव्य

आपल्याला आपले हक्क अधिकार समजून घेण्यासाठी संविधान कळले तरच संविधानासोबत काय धोके सुरू झालेत हे कळेल असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

राज्यात मजबूत विरोधी पक्षाची गरज; सुषमा अंधारेंचे वक्तव्य
राज्यात मजबूत विरोधी पक्षाची गरज; सुषमा अंधारेंचे वक्तव्य

गोंदिया: राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आदिवासीबहुल मागास जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. या जिल्ह्यातील समस्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. या समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी राज्यात मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. गोंदियातील महाप्रबोधन यात्रेदरम्यान त्या बोलत होत्या.

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, असे सांगतात. दुसरीकडे, आजही भात शेतीच्या जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना आपले धान व्यापारीवर्गाला विकण्याची वेळ आली आहे. मग शेतकरी मुलगा म्हणून सांगून काय अर्थ, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा: ‘शिवसेना परिवारातील मी शेंडेफळ, मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही’; सुषमा अंधारे

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केलेल्या टिकेबद्दल बोलताना महाजनांची भाची पंकजा मुंडे यांना भाजपने कशापध्दतीने बाहेर टाकले आहे, आधी त्याचा विचार करावा. आपल्या भाचीला ज्या भाजपने कैद करुन टाकले त्याच भाजपची मनसेच्या माध्यमातून पाठराखण करुन काय सिध्द करता. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी टिंगल टवाळी न करता आपल्या प्रवक्त्यांची संस्काराची कार्यशाळा घ्यावी, असे त्या म्हणाल्या. आपल्याला आपले हक्क अधिकार समजून घेण्यासाठी संविधान कळले तरच संविधानासोबत काय धोके सुरू झालेत हे कळेल.

हेही वाचा: ‘अमरावती: पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे; सरावादरम्यान तरुणीचा अपघाती मृत्यू

संविधानाने या देशाला दिलेल्या बहुपक्षीय पध्दतीला सध्या भाजप संपवण्याचे काम करीत असल्याचे सांगत विरोधी पक्षच जर राहिला नाही तर हुकूमशाही पद्धती रुजू होऊन देशाचे संविधानच नव्हे तर सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. राज्यात ज्यापध्दतीने भाजपचे नेते व राज्यपाल महापुरुषांचा अवमान करीत आहेत, त्यावर कारवाई न करता गृहमंत्री गप्प बसून आहेत, यावरुन फडणवीसांचेच तर त्यांना पाठबळ नाही ना, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. रवी राणा व बच्चू कडूंच्या प्रकरणात फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली, अशीही टीका त्यांनी केली. राज्य सरकारला मंत्री पदासाठी एकही पात्र महिला आमदार मिळाली नसल्याने महिलांच्या समस्या कोणाकडे मांडायच्या, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 18:10 IST
Next Story
‘समृद्धी महामार्गामुळमुळे विदर्भ, मराठवाडा समृद्ध होईल’; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास