scorecardresearch

Premium

नागपूर: शाळेच्या सुरक्षारक्षकाने केले विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

अनिल चव्हाण असे आरोपी सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

In this case, on the complaint of the girl's parents, the Nandanvan police registered a case and arrested the security guard.
शाळेच्या सुरक्षारक्षकाने केले विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: आष्टीतील भवन्स शाळेतील विद्यार्थी सारंग नागपुरे याच्या मृत्यूमुळे शहरातील पालक वर्ग चिंतेत असतानाच आणखी एका घटनेने पालक वर्गाच्या चिंतेत भर घातली आहे. नंदनवनमधील स्टार पॉईंट शाळेतील एका विद्यार्थिनीशी शाळेच्या सुरक्षारक्षकाने अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. अनिल चव्हाण असे आरोपी सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

नंदनवनचे ठाणेदार गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नंदनवनमधील स्टार पॉईंट शाळेत शिकते. त्या शाळेवर अनिल चव्हाण हा सुरक्षारक्षक पदावर नोकरी करतो. गेल्या २६ ऑक्टोबरला पीडित विद्यार्थीनी शाळेत आली होती. शाळा सुटल्यानंतर आरोपी सुरक्षारक्षकाने त्या चिमुकलीशी अश्लील वर्तन केले. त्यामुळे मुलीने रडत-रडत आपल्या पालकांना सांगितले.

decision of sunil shukre appointment as backward class commission chief challenge in court mumbai
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती शुक्रे यांच्या नियुक्तीला आव्हान, कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता नियुक्ती
Teacher Recruitment
शिक्षक भरती : दलाल, मध्यस्थ सक्रिय; ‘ही’ घ्या काळजी…
coaching classes latest news in marathi, coaching classes start up status marathi news, coaching classes ban marathi news
बंदी कसली… कोचिंग क्लासेसना ‘स्टार्टअप’ दर्जा द्या
madan dilawar
शाळा गणवेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई, राजस्थानचे शिक्षणमंत्री म्हणाले; “हनुमानासारखा वेश…”

हेही वाचा… वाशिम: आरोग्य विभागातील ६०० डॉक्टर, कर्मचारी बेमुदत संपावर; आरोग्य यंत्रणा सलाईनवर!

शहानिशा केल्यानंतर सुरक्षारक्षक चव्हाण याची कानउघडणी करण्यात आली. पालकांनी ३१ ऑक्टोबरला नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सुरक्षारक्षक अनिल चव्हाणला अटक केली. सध्या त्या सुरक्षारक्षकाची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The police have arrested the security guard of star point school in nandanvan nagpur after he sexually assaulted a girl student adk 83 dvr

First published on: 07-11-2023 at 15:22 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×