अकोला: फिर्यादीनेच जबरी चोरी झाल्याचा बनाव रचल्याचा प्रकार पोलीस तपासात शुक्रवारी समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केला.

कान्हेरी सरप येथील रहिवासी निवृत्ती महादेव बोळे (२५, रा.कान्हेरी सरप) हा युवक दुचाकीने पिंजर मार्गे मूर्तिजापूरकडे जात असतांना दोनदजवळ एका इसमाने त्यांना थांबवले. त्यानंतर संबंधित इसमाने दोन फोन करण्याची विनंती बोळे यांच्याकडे केली. बोळे यांचा फोन घेउन दोन फोन केल्यानंतर या अज्ञात इसमाने बोळेकडील तब्बल ३२ हजार ५०० रुपये व साहित्य लंपास केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी घडल्याची तक्रार पिंजर पोलीस ठाण्यात दिली होती. यावरुन पिंजर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने देखील सुरू केला.

district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Theft , Achole police, Vasai , Vasai strange case,
खरा चोर कोण….? एका विचित्र चोरीचा नाट्यमय तपास
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Nagpur, suicide , police station,
नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…

हेही वाचा… “संसदेवर राजकीय दलालांचे वर्चस्व होते, म्हणून सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आणि…” उपराष्ट्रपतीचे वादग्रस्त विधान, म्हणाले…

घटनास्थळाजवळ स्थानिक गुन्हे शाखेने कसून चौकशी केली असता तसेच फिर्यादी निवृत्ती बोळे यांना घटनेची पूर्ण माहिती वारंवार विचारल्यानंतर तफावत आढळल्याने पोलिसांना या चोरीमध्ये संशय आला. तांत्रिक व गोपनीय पद्धतीने माहिती घेण्यात आली. त्यानंतर लुटमार प्रकरणातील फिर्यादी निवृत्ती बोळे याची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी चौकशी केली. त्याने असा गुन्हा घडलाच नसल्याची माहिती देत ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी खर्च झाल्याने ते लपवण्यासाठी चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली. यावरुन पोलिसांनी हा खोटा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद देशमुख, गोपाल जाधव, महेंद्र मलीये, अविनाश पाचपोर, विशाल मोरे, प्रशांत कमलाकर यांनी केला.

Story img Loader