नक्षलवाद्यांवर ठेवणार अंकुश

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत छत्तीसगड सीमेवरील भामरागड पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम मन्नेराजाराम येथे स्थानिकांच्या मदतीने एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभे केले. या कामात एक हजार जणांनी हातभार लावला. पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून छत्तीसगड सीमेवरून जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे.

दक्षिण गडचिरोली परिसर नक्षल कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील समजला जातो. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस मदत केंद्रांची गरज आहे. त्यादृष्टीने गडचिरोली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मन्नेराजाराम येथे एका दिवसात पोलीस मदत केंद्राची स्थापना केली. बुधवारी एक हजार लोकांच्या मदतीने एका दिवसात हे केंद्र उभे केले. भामरागड पोलीस उपविभागांतर्गत येणारा हा परिसर छत्तीसगड सीमेवर असून येथून मोठ्या प्रमाणात नक्षल्यांची हालचाल असते. या पोलीस मदत केंद्रामुळे नक्षली कारवायांवर अंकुश ठेवण्यास मोठी मदत होणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड

हेही वाचा >>> Maharashtra police recruitment : कडाक्याची थंडी, त्यात निवाऱ्याचा अभाव, पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे हाल

वायफाय सुविधेसह सुसज्ज असलेल्या या केंद्रात २० पोर्टा कॅबिन, मॅकवॉल, सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ३ अधिकारी, ४६ अमलदार, एसआरपीफचे २ अधिकारी व ५० अमलदार तसेच सीआरपीएफचे एक असिस्टंट कमांडंट, ४ अधिकारी व ६० अमलदार तैनात करण्यात आले आहेत. यावेळी घेतलेल्या जनजागरण मेळाव्यात गावातील नागरिकांना विविध साहित्यांचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक लोकेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या नवव्या बटालियनचे कमांडंट बाळापूरकर, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, आदी अधिकारी उपस्थित होते.