नागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात अनेक विषयांवरून वाद होणे नवीन नाही. मात्र, बुधवारी अचानक एक पोलीस अधिकारी आणि वकिलामध्ये चांगलीच बाचाबाची झाली असून पोलीस अधिकाऱ्याकडून वकिलाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा न्यायालय परिसरात वकिलांची मोठी गर्दी असते. यादरम्यान पाेलीस अधिकारी आणि वकिलामध्ये काही कारणास्तव बाचाबाची झाली.

हेही वाचा >>> नागपूर : निर्दयी बापाने फरशीवर फेकलेल्या चिमुकल्याचा अखेर मृत्यू

Husband Seeks Court Intervention, habeas corpus, Eloped with Facebook Friend, wife escaped with Facebook Friend, high court nagpur,
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव
pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
High Court, Expresses Anger, maharashtra Government, Delay, Taking Possession, New High Court Building, Site in Bandra,
जागा हस्तांतरणाला होणाऱ्या विलंबावरून उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारची कानउघाडणी

संबंधित वकिल न्यायालयामध्ये प्रवेश करताना चुकीच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. यावरून दोषांमध्ये सुरुवातीला शाब्दीक वाद झाला. त्यानंतर वाद वाढत गेला व पोलिसांनी संबंधित वकिलाचे तोंड फोडल्याची माहिती आहे. या घटनेचा वकील संघटनांकडून निषेध केला जात आहे. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही वकिलांकडून केली जात असल्याची माहिती आहे.