scorecardresearch

वर्धा: संमेलनाध्यक्षनाच मंचावर पोलिसांची आडकाठी ! कन्या भक्ती चपळगावकर यांची जाहीर नाराजी

वर्धा येथे आयोजित साहित्य संमेलनात खुद्द संमेलनाध्यक्षनाच पोलिसांकडून आडकाठी घातली गेली.

sahitya sammelan

वर्धा येथे आयोजित साहित्य संमेलनात खुद्द संमेलनाध्यक्षनाच पोलिसांकडून आडकाठी घातली गेली. यामुळे संतापलेल्या चपळगावकर यांची कन्या भक्ती चपळगावकार यांनी समाज माध्यमावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, माझे बाबा ८५ वर्षांचे आहेत.

ते त्यांचे मित्र वयोवृद्ध डॉ. सुधीर रसाळ यांच्या सोबत समेलनस्थळी येत असताना त्यांना पोलिसांनी अडवले. मुख्यमंत्रांच्या वेळी ९०० पोलीस होते.आताही बरेच पोलीस वाट अडवत आहेत. माझा धीर संपला, मी ओरडले तेव्हा कुठे पोलिसांनी बाबांना सोडले, असेही त्यांनी खेदपूर्वक नमूद केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 12:18 IST