वर्धा: आदिवासी आश्रमशाळेत मुलींचा वारंवार विनयभंग होत असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. देवळी तालुक्यातील नवजीवन आदिवासी आश्रमशाळेतला हा प्रकार शाळेतीलच अधीक्षीकेने चव्हाट्यावर आणला. या शाळेतील एक पुरुष स्वयंपाकी पाचव्या वर्गातील मुलींसोबत अश्लिल चाळे करतो. तसेच अश्लिल शब्दात मुलींशी बोलत असल्याने मुली भयग्रस्त झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग रडत-रडत आपल्याजवळ सांगितला. त्यामुळे या कर्मचाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, असे मुलींचे म्हणणे आहे. तसेच या अबोध विद्यार्थींनींना संरक्षण मिळावे, अशी मागणी अधीक्षीकेने देवळी पाेलीसांकडे केली. या तक्रारीवर सध्या चौकशी सुरू आहे. हेही वाचा. केदारनाथ धामचे गोंदियात दर्शन! जांगळे कुटुंबीयांनी साकारला केदारनाथ मंदिराचा देखावा मुलींची विचारपूस सुरू असून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर पुढील कारवाई करू, असे देवळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पिदूरकर यांनी सांगितले, तर संस्थाध्यक्ष सुरेश राऊत म्हणाले की, असे काही घडले असेल अशी शक्यता नाही. कर्मचाऱ्यांतील हेवेदाव्यातून तक्रार झाली असावी.