The tiger forest department Tigers killed 182 people ysh 95 | Loksatta

वाघाने केली चक्क वनखात्याची तिजोरी रिकामी…

जंगलातल्या वाघाची अधिवासासाठी चाललेली ही लढाई आणि त्यातून मग माणसासोबत झालेल्या संघर्षाचा उडालेला भडका आजतागायत शांत झालेला नाही.

वाघाने केली चक्क वनखात्याची तिजोरी रिकामी…
(संग्रहित छायाचित्र)

वाघांनी मारली १८२ माणसे

तुम्ही आमच्या घरात आलात ना, मग आम्ही जायचे कुठे? आता आम्हीही तुमच्या घरात येणार. जंगलातल्या वाघाची अधिवासासाठी चाललेली ही लढाई आणि त्यातून मग माणसासोबत झालेल्या संघर्षाचा उडालेला भडका आजतागायत शांत झालेला नाही. याउलट तो वाढतच गेला. यात कधी वाघांचा बळी गेला, तर माणसांना मारले म्हणून त्याला कायमचे गजाआड व्हावे लागले. मात्र, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या वनखात्यानेच त्याला पिंजऱ्यात टाकले म्हणून त्यानेही खात्याला सोडले नाही. खात्याची तिजोरी त्याने कोट्यावधी रुपयाने रिकामी केली.

हेही वाचा >>> देव तारी त्याला कोण मारी! वाघाने दुचाकीवर झडप घेतली अन्…

राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात माणसांचा बळी जात आहे. मात्र, त्याचवेळी यातील ९० टक्के हल्ले हे माणसांच्या जंगलातील घुसखोरीमुळे होत आहेत. गेल्या चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २९८ माणसे मारली गेली. त्यातील १८२ बळी हे वाघाने घेतले आहेत. गेल्या चार वर्षात हा आकडा वाढतच चालला आहे. २०१९ मध्ये २४, २०२० मध्ये ३९, २०२१ मध्ये ५४ तर २०२२ मध्ये ६५ माणसांचा बळी वाघाने घेतला आहे. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या मानव व पशूधन हानीसाठी नुकसान भरपाई म्हणून खात्याच्या तिजोरीतून गेल्या चार वर्षात  ३५६.६४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:12 IST
Next Story
नागपूर: फडणवीस, बावनकुळेंच्या जिल्ह्यातील ग्रा.प. निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती