scorecardresearch

Premium

वर्धा : मुसळधारेने पूल कोसळला, सहा गावांचा संपर्क तुटला

देवळी शहराशी संपर्काचे माध्यम असलेला यशोदा नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे कोसळला.

bridge
यशोदा नदीवरील पूल ( प्रतिनिधिक छायाचित्र )

देवळी शहराशी संपर्काचे माध्यम असलेला यशोदा नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे कोसळला. परिणामी, सहा गावांचा संपर्क तुटला आहे.

देवळी डिगडोह मार्गावर यशोदा नदीवरील रस्त्यात छोटा पूल आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. देवळी येथेही असाच पाऊस झाल्याने बरीच पडझड झाली. यशोदा नदीवर बांधलेला पूल या पावसात खचला. त्यामुळे डिगडोह, नागझरी, मुरदगाव, येसगाव व अन्य गावांचा देवळीशी संपर्क तुटला. याच मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी देवळीत जाणे, येणे करीत असतात.

Arrested a gang of robbers
वर्धा : महामार्गावर लुटमार! तोतया पोलिसांची आंतरराज्यीय टोळी
heavy rainfall recorded ain sangli district
सांगली: धनगरवाड्यात पावसाचा धुमाकूळ, दोन तासात १६१ मिमी.
monsoon
Monsoon Update: दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज 
rain in Nagpur
नागपूरसह विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’, येत्या ४८ तासांत मोसमी पाऊस सक्रिय राहणार

मात्र, आज कोणीही देवळीत येवू शकले नाही. वीस वर्षापूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. त्यानंतर गत काही वर्षात काहीच डागडूजी झाली नाही. हा मार्ग लगेच सुरू व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. देवळीचे तहसीलदार सरवदे यांच्याशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The torrential downpour caused the bridge to collapse cutting off communication between six villages amy

First published on: 05-07-2022 at 18:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×