दोन महाविद्यालयीन तरुणी आपापल्या आई-वडिलांसह एका पोलीस ठाण्यात आल्या. ‘साहेब…आम्हा दोघींचे एकमेकीवर जीवापाड प्रेम आहे. आम्हाला एकमेकींचे जीवनसाथी बनायचे आहे. मात्र, कुटुंबीयांचा याला विरोध आहे. त्यामुळे तुम्ही हा गुंता सोडवा’, अशी विनंती तरुणींनी केली. पोलीस ठाण्यात तासभर वाद, चर्चा झाल्यानंतर या नाजूक नात्याचा गुंता सोडवण्यात यश आले.

प्रिया आणि रिया (काल्पनिक नाव) यांची वर्षभरापूर्वी फेसबुकवरून ओळख झाली. दोघींनी एकमेकींशी काही दिवस ‘चॅटिंग’ केली. त्यानंतर एकमेकींचे भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन एकमेकींना भेटल्या. दोघींची ‘खास’ मैत्री झाली. प्रिया हिने इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे, तर रिया पदवीच्या पहिल्या वर्षाला आहे. प्रिया खासगी नोकरी करते व रिया ही ‘पार्टटाईम जॉब’ करते. दोघींचे एकमेकींच्या घरी येणे-जाणे वाढले. त्यांनी मैत्रीण असल्याची ओळख एकमेकींच्या आई-वडिलांना करून दिली. दोघीही एकमेकींना खूप वेळ द्यायला लागल्या. दोघींच्याही वागण्यात बदल झाला. त्यामुळे त्यांच्या पालकांना संशय आला. दोघीही एकमेकींची नको तेवढी काळजी घ्यायला लागल्या. त्यामुळे प्रियाच्या आईच्या मनात संशय निर्माण झाला.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

हेही वाचा: मंत्रिपदाची चर्चा अन् समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर मुख्यमंत्री शिंदे यांची मेहरनजर

आईने दोघींनाही एकत्र बसवून विचारपूस केली. त्यावेळी दोघींनीही ‘आम्ही एकमेकींवर जीवापाड प्रेम करतो आणि आम्हाला सोबत राहायचे आहे,’ असे म्हणाल्या. प्रकरणाला गंभीर स्वरूप आल्याने प्रियाच्या आईने रियाच्या आईवडिलांना बोलावून घेतले. दोघींची समजूत घातली. समाज आणि बदनामी याबाबत दोघींनाही अवगत केले. मात्र, त्या ऐकायला तयार नव्हत्या. प्रेमात वेड्या झालेल्या दोघींनीही एकमेकींपासून दूर राहण्यास प्रखर विरोध दर्शवला.

पती-पत्नीप्रमाणे वेगळे राहण्याचा हट्ट
आम्हाला अन्य पती-पत्नीप्रमाणे वेगळे राहायचे आहे. पालकांसोबत राहिल्यास आमच्या प्रेमाला विरोध होईल, अशी भूमिका दोघींनी घेतली. पालकांनी प्रियाच्या लग्नासाठी मुलगा बघितला होता. त्यामुळे तिचे लग्न लावून देण्यावर आई ठाम होती. परंतु दोघींनी नव्याने संसार थाटण्याची तयारी केली होती व वेगळे घरही बघितले होते. त्यांचे पालक मात्र त्यांना स्वतंत्र वेगळे राहू देण्यासाठी तयार नव्हते.

हेही वाचा: नागपूर: अंबाझरी तलावात आणखी एका मुलाचा बुडून मृत्यू; ११ महिन्यांतील १४ वी घटना

वेगळे राहण्यास परवानगी
ठाणेदाराने तरुणी आणि पालकांची बाजू ऐकून घेतली. त्यांना कायदा आणि कारवाई याबाबत अवगत करून दिले. ‘सारथी ट्रस्ट’च्या पदाधिकाऱ्यांना बोलावून मदत घेतली. दोघींनीही दर महिन्याला पगारातील काही रक्कम आपापल्या पालकांना देण्याचे ठरले. त्यांना वेगळे राहण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, पालकांना त्यांच्या घरी येण्याची मोकळीक देण्यात आली.