नागपूर: महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राख बंधाऱ्याच्या आतील एक पाणी अडवणारा बंधारा मंगळवारी पहाटे फुटला. कोराडी मंदिराच्या मागील बाजूस घडलेल्या या घटनेमुळे तेथे राख उचलण्यासाठी गेलेले आठ ट्रक पाण्यात बुडाल्याने खळबळ उडाली.

कोराडी वीज निर्मिती प्रकल्पातून निघणारी राख येथील एका राख बंधाऱ्यात साठवून ठेवली जाते. या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात महानिर्मितीकडून नियुक्त कंत्राटदार नित्याने राख उचलून वितरीत करतात. दरम्यान मंगळवारी पहाटेपासून येथे बंधाऱ्याच्या आतमध्ये राख उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी एका जेसीबीचा पंजा आतमधील पाणी अडवलेल्या बंधाऱ्यावर पडला. त्याने बंधाऱ्यातील पाणी बाहेर झिरपू लागले. दरम्यान हळू- हळू पाण्याचा वेग वाढला. थोड्याच वेळात राखेची उचल होणाऱ्या भागात हे पाणी शिरले. यावेळी येथे राखेची उचल करण्यासाठी उभे असलेले आठ ट्रक पाण्यात बुडाले. ही माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांचे धाबे दणाणले. तातडीने काही अधिकारी घटनास्थळी पोहचले.

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
forecast to rain along with wind in most parts of the state
गुढीपाडव्याला हलक्या सरी?
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

हेही वाचा – VIDEO : वाघांचा मॉर्निंग वॉक, अन तो ही असा शिस्तीत… पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या व्हिडीओची चर्चा

महानिर्मितीच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, कोराडी प्रकल्पातील राख बंधाऱ्यातील राख नि:शुल्क वितरीत केली जाते. ही राख उचलण्याचे काम खासगी व्यक्तीकडे आहे. येथे राख उचलून नेण्यासाठी पाण्याची अडचण होऊ नये म्हणून मध्ये पाणी अडवण्यासाठी राखेचा एक बंधाराही तयार आहे. मंगळवारी पहाटे राखेची उचल करताना चुकीच्या ठिकाणी खोलगट भाग तयार झाल्याने पाणी अडवून ठेवणारा हा बंधारा फुटला. बंधाऱ्यातील पाणी राखेची उचल सुरू असलेल्या भागात गतीने शिरले. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की काही वेळातच हे ट्रक पाण्यात बुडाले. या घटनेने राखेची उचल करणारे ट्रकचे नुकसान वगळता इतर कोणतेही नुकसान झाले नसल्याचा महानिर्मितीचा दावा आहे.

हेही वाचा – निवडणूकपूर्व बदल्यांच्या नियमांना नागपुरात तिलांजली

नियोजनाचा अभाव

“मौदा येथील ‘एनटीपीसी’ प्रकल्पातील राखेच्या बंधाऱ्याचे आतून निरीक्षण केल्यास तेथे बंधाऱ्याच्या आतही विविध कप्पे करण्यात आले आहे. प्रत्येक कप्यात जाण्यासाठी रस्त्याचे नियोजन आहे. तेथपर्यंत वाहनेही जातात. हे बांधकाम चांगल्या दर्जाचे आहे. परंतु महानिर्मितीच्या राखेच्या बंधाऱ्यात काहीही नियोजन नाही. त्यामुळे कधी बंधारे फुटने तर कधी इतर अनुचित घटना घडतात. येथील कामाचे अंकेक्षण व्हायला हवे.” – लिना बुद्धे, संस्थापक, सेंटर फाॅर सस्टेनेबल डव्हलपमेंट.