वर्धा : देवाच्या साक्षीने सात जन्माची गाठ ज्या पतीसोबत बांधली त्याला याच जीवनात संपवून टाकण्याचा थरारक प्रकार उजेडात आला आहे.सध्या पुलगावातील गाडगेनगरात वास्तव्य राहलेला सचिन दीपक घरत हा पत्नी सारिका सोबत संसार करीत होता. सचिनला दारूचे व्यसन जडल्याने पती पत्नीत नेहमी खटके उडायचे.त्यातच सारिका व सुरज करलूके  यांच्यात प्रेमसंबंध जुळले. पतीचा नेहमी होणारा त्रास तिने सुरज जवळ व्यक्त करीत काही करण्याची सुचविले.अखेर या दोघांनी प्रियकर सुरजचा मानलेला भाऊ विक्की आमझरे यांच्या मदतीने पती सचिन यास कायमचा संपविण्याचा कट रचला.

घटनेच्या दिवशी १६ एप्रिलला सचिन, सुरज व विक्की हे तिघे मिळून नाचणगाव येथील कॅनल वर गेले. तिघांनीही दारू ढोसली. मग मद्यधूंद  झालेल्या सचिनला खाली पाडण्यात आले. सुरजने गळा आवळला. मात्र सचिन ठार नं झाल्याने सुरज व विक्कीने मिळून दुपत्त्याने गळा आवळून सुरजच्या नरडीचा घोट घेतला.मृतदेह वाहनात टाकून तो दुरवर हिवरा कावरे येथील नदीपात्रात फेकून दिला.हा मृतदेह देवळी पोलिसांच्या हाती लागला. त्यांनी १८ एप्रिल रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र त्याच दिवशी पत्नी सारिका हिने पुलगाव पोलिसांकडे पती मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना या बाबतीत संशय वाटला. त्यांनी तपासाची उलट चक्रे फिरविली.  तेव्हा हा कट रचून खून केल्याचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले.

Theft of gold by tricking a jeweler on Gupte Road in Dombivli
डोंबिवलीत गुप्ते रोडवरील जवाहिऱ्याला फसवून सोन्याच्या ऐवजाची चोरी
dead
बुलढाणा: वाढदिवसाला हातात जहाल विषारी साप दिला; ‘थरारक’ प्रयोग जीवावर बेतला…
Bhiwandi, girl, sexually assaulted,
नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, भिवंडीत धक्कादायक प्रकार
Buldhana, abuse, girl, father, court,
बुलढाणा : पवित्र नात्याला कलंक! अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार, न्यायालयाने सुनावली ‘ही’ कठोर शिक्षा
seven month old baby swallowed three keys the doctors of Rajawadi Hospital saved the babys life
सात महिन्याच्या बाळाने गिळल्या तीन चाव्या, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचविले बाळाचे प्राण…
Dombivli, husband, wife, swords, crime news
डोंबिवलीत पती-पत्नीला तलवारीचा धाक दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: पाद्यपूजा..

हेही वाचा >>>भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी आता मिशी काढून… खासदार प्रतिभा धानोरकर यांचा टोला

 नाचणगाव येथे दारू ढोसण्यापूर्वी  तिघेही  अमरावती जिल्ह्यातील विटाळा येथील बार मध्ये गेले होते. तिथे तिघेही दारू  पिऊन सायंकाळी निघाले. सोबत परत दारूची बाटली घेतली. नाचणगाव येथे पोहचताच सचिनला परत दारू पाजली. इथेच त्याच्या जीवाचा अंत केल्याची कबुली आरोपी सुरज व विक्कीने दिली आहे. त्यांनी या प्रकरणात पत्नी सारिका हिचा असलेला सहभाग नमूद केल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली आहे.तिने कबुली दिल्यावर पुलगाव पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. मृत सचिन ३६,  हा यवतमाळ जिल्ह्यातील आष्टीचा असून तो पुलगाव येथे राहायला आला होता. तर पत्नी मूळची कळंब येथील तसेच आरोपी सुरज व विक्की हे  आपटी येथील आहेत.

दोन दिवसापूर्वी अश्याच एका खून प्रकरणाची उकल १५ दिवसानंतर झाली होती. खुनाचा गुन्हा लपविणे शक्य नसल्याचे वर्धा पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात दाखवून दिले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यात  पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे व त्यांच्या चमूतील विनोद रघाटाटे, राजेंद्र हाडके आदिनी यश प्राप्त केले.