नागपूर : बैतूल येथे रामपाल महाराज यांचा सत्संग ओटोपून परत जाणाऱ्या एका महिलेने चालत्या रेल्वेगाडीत चढण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाय घसरला आणि त्या चक्क रेल्वेगाडी आणि फलाट यामधील फटीत पडली. रेल्वे सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षकाने धावत जाऊन गाडीची साखळी खेचली आणि गाडी थांबली. या महिलेला बाहेर काढण्यात आले. आरपीएफच्या जवानामुळे या महिलेचे प्राण वाचले. मात्र डाव्या पायाला गंभीर इजा झाली. ही घटना आमला येथे घडली. ही महिला दक्षिण एक्स्प्रेसने नागपूरला येत होती.
(१२७२२) दक्षिण एक्सप्रेस आमला येथून नागपूरकडे रविवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी फलाट क्रमांक दोन वरून सुटली. एक वयोवृद्ध महिला प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होती. त्यांचा पाय घसरून तोल गेला आणि त्या पडल्या. उपनिरीक्षक शिवरामसिंह यांनी फलटावर तैनात होते. त्यांनी धावत जाऊन रेल्वेगाडीची साखळी खेून गाडी थांबवली. सहायक उपनिरीक्षक एस.एन. यादव आणि पोलीस शिपाई हरमुख गुर्जर यांना बोलावून प्रवाशांच्या मदतीने फलाट आणि रेल्वेगाडी यामधील फटीत अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्यात आले. या महिलेचे नाव बुधनीबाई धनसाय पटेल असून तिचे वय ७० वर्ष आहे. ती छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील रोगदा येथील आहे. त्या आपले कुटुंबीय आणि गावातील नागरिकांसोबत बैतूल येथे रामपाल महाराज यांचा सत्संगात गेल्या होत्या. दक्षिण एक्स्प्रेसने घरीत परत जात होत्या. या गाडीच्या सर्वसाधारण डब्यात गर्दी असल्याने त्या शयनयान डब्यात बसल्या होत्या. गाडी आमला येथे आल्यानंतर त्या सर्वसाधारण डब्यात जाण्यासाठी उतरल्या.




हेही वाचा >>>टिपेश्वर अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या; पांढरकवडा तालुक्यातील घटना
सर्वसाधारण डब्यापर्यंत जाण्यापूर्वीच गाडी सुरू झाल्याने त्या परत शयनयान डब्यात चढण्याचा प्रयत्नात असताना पाय घसरला. त्यांचा तोल गेला. गाडी आणि फलाटामधील फटीत त्या पडल्या. त्यांच्या डाव्या पायाला दुखापती झाली. लगेच रुग्णवाहिका बोलवण्यात आली. परंतु बराच वेळापर्यंत रुग्णवाहिका पोहचली नाही. म्हणून उपनिरीक्षक शिवराम सिंह यांनी यादव यांना खासगी ऑटोरिक्षा बोलावून आमला येथील शासकीय रुग्णालयात त्यांना भरती केले. या घटनेमुळे दक्षिण एक्सप्रेस आमला स्थानकावर विलंब झाला.