आंबटशौकीन असलेल्या एका वृद्ध डॉक्टरने एका तरुणीला अश्लील ‘व्हिडिओ कॉल’ केला. त्यानंतर त्या तरुणीने डॉक्टरचे अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन १६ लाख २५ हजार रुपयांनी लुटले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूरच्या मिनाक्षी वाळकेंचा ‘बांबू गणेश’ इंग्लंडच्या दूतावासात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ. प्रदीप (वय ५८, काल्पनिक नाव) यांना जुलै महिन्यात त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संदेश आला. त्या तरूणीने स्वत:चे नाव प्रिया असल्याचे सांगून ‘चँटिंग’ केली. तीन दिवसांनंतर प्रियाने पुन्हा संदेश पाठवून ‘न्यूड कॉल’ करू का? अशी विचारणी केली.हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया कक्षात (ओटी) असलेल्या डॉ. प्रदीपने तिला होकार दिला. प्रियाने त्यांना ‘व्हिडिओ कॉल’ केला. तिने स्वत:चे कपडे काढले. त्यानंतर डॉक्टरलाही अश्लील ‘व्हिडिओ’ करण्यास भाग पाडले. प्रियाने पुन्हा दोन दिवसानंतर फोन केला आणि वृद्ध डॉक्टरला पैशाची अडचण असल्याचे सांगून १० हजार रुपयांची मागणी केली. त्या बदल्यात पुन्हा अश्लील व्हिडिओ कॉल करण्याचे आमिष दाखवले. वृद्ध डॉक्टरने तिला पैसे पाठवले.

हेही वाचा >>> अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी आज मुलाखती

डॉक्टर जाळ्यात अडकल्याचे बघून तिने डॉक्टरला आणखी पैशाची मागणी केली.आंबटशौकीन डॉक्टरने तिला जवळपास ६ लाख रुपये दिले. सायबर गुन्हेगाराच्या टोळीची सदस्य असलेल्या प्रियाच्या जाळ्यात डॉक्टर पूर्णपणे अडकले होते. डॉक्टरला तिने ‘व्हिडिओ’ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे उकळणे सुरू केले.सायबर गुन्हेगार तरूणीच्या साथिदाराने डॉ. प्रदीप यांना फोन करून अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केली. याच दरम्यान डॉक्टरच्या मुलाचे लग्न होते. त्यामुळे लग्नात कोणतेही विघ्न नको म्हणून ‘यु-ट्यूब’चा तोतया प्रमुख राहुल मिना याच्या खात्यात डॉक्टरने पाच लाख रुपये वळते केेले.

प्रिया हिला ६ लाख रुपये, राहुल मिना याला ५ लाख रुपये दिल्यामुळे सर्व समस्या सुटल्याचे डॉ. प्रदीप यांना वाटले. परंतु, त्यांना दोन दिवसांनी दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने फोन आला. ‘तुमच्या नावाने तक्रार असून तुम्ही एका महिलेशी अश्लील चित्रफित काढली आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल’ असे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या वृद्ध डॉक्टरकडून तोतया पोलिसांनीही ५ लाख रुपये उकळले. अशा प्रकारे सायबर गुन्हेगार तरूणीने १६ लाख २५ हजार रुपये डॉक्टरकडून उकळले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.