Premium

अकोला: धक्कादायक! ‘क्राईम शो’चा दुष्परिणाम; किरकोळ वादातून माहेरी आलेल्या मोठ्या बहिणीवर लहान बहिणीचे चाकूने सपासप वार

या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी लहान बहिणीला अटक केली आहे.

younger sister killed elder sister knife due minor dispute akola
धक्कादायक! ‘क्राईम शो’चा दुष्परिणाम; किरकोळ वादातून माहेरी आलेल्या मोठ्या बहिणीवर लहान बहिणीचे चाकूने सपासप वार

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला: ‘क्राईम शो’ पाहून मनावर परिणाम झालेल्या लहान बहिणीने किरकोळ वादातून मोठ्या बहिणीवर चाकूने सपासप वार करून यमसदनी धाडल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील खडका गावात घडली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी लहान बहिणीला अटक केली आहे.

जिल्ह्यातील बोरगाव मंजू पाेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खडका गावात विठ्ठल वसतकार हे कुटुंबीय पत्नी, दोन मुली व एक मुलासह राहत होते. मोठी मुलगी रेश्माचा (२४) विवाह झाला होता. लहान मुलगी रविना (२१) ही घरीच राहत होती. रविनाला टीव्हीवर ‘क्राइम शो’ पाहण्याची आवड होती. रक्तरंजित हत्या, प्राणघातक हल्ले पाहून रविनाच्या मनावर परिणाम झाला. तसेच ती मानसिक आजारी असल्याचेही बोलले जाते.

हेही वाचा… यवतमाळ : बापरे! त्यांनी चोरल्या अकरा दुचाकी; तक्रार दाखल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गेल्या काही महिन्यांपासून रविना मानसिक तणावात होती. तिच्यावर मनोरुग्ण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, गत आठवड्यात मोठी मुलगी रेश्मा माहेरी आली. दरम्यान, २९ मे रोजी उशिरा रात्री विठ्ठल वसतकार व त्यांची पत्नी घरात बसले होते. दोन्ही बहिणी खोलीमध्ये बोलत असतांना त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात लहान बहिण रविनाने धारदार चाकूने मोठी बहिण रेश्मावर सपासप वार केले. ती गतप्राण होत नाही, तोपर्यंत हल्ला करीत राहिली.

हेही वाचा… शिवसेना ते काँग्रेस राजकीय प्रवासात धानोरकरांची लढाऊ वृत्ती कायम

प्रचंड गोंधळ ऐकून आई-वडील खोलीत दाखल होताच त्यांना मोठी मुलगी रेश्मा ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हे पाहून आई-वडिलांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून रेश्माचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी रविनाला अटक करून तिच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The younger sister killed the elder sister with a knife due to a minor dispute in akola ppd 88 dvr

First published on: 30-05-2023 at 13:32 IST
Next Story
चंद्रपूर : बँकेची एक कोटीने फसवणूक करणारा जाळ्यात; अडीच वर्षांपासून होता फरार, सावली पोलिसांची कारवाई