लोकसत्ता टीम

नागपूर: उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाच दिवसांमध्ये एका निवासी डॉक्टर व एका कर्मचाऱ्याची अशी एकूण दोन दुचाकी वाहने चोरीला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

yavatmal, Fire Breaks Out, Gynecology Department, Yavatmal government Medical College, No Casualties Reported, vasantrao naik government Medical College , fire in hospital, fire in yavatmal hospital,
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

मेडिकलमध्ये दर दिवसाल पंधरा ते वीस हजार लोकांचा वावर असतो. यामुळे येथे चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्याचे मेडिकल प्रशासनावर मोठे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने पार्किंगमध्ये नसलेले वाहन वाहतूक पोलिसांकडून उचलण्यात येत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता. अलीकडे हा प्रकार बंद झाला. मात्र, मोठ्या प्रमाणात सायकल आणि वाहन चोरी होत असल्याचे कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक सांगत आहे. पाच दिवसांपूर्वी येथील नेत्ररोग विभागासमोर ठेवलेल्या निवासी डॉक्टरचे वाहन चोरीला गेले. यानंतर दुसऱ्या एका निवासी डॉक्टरचे वाहनही बेपत्ता झाले. या प्रकरणाची तक्रार अजनी पोलिस ठाण्यात दिली, परंतु पुढे काही झाले नाही. नुकतेच निवासी डॉक्टरांच्या नव्या चमूने वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांची भेट घेऊन तक्रार केली आहे.

आणखी वाचा-नागपूर : फडणवीस यांची ग्रामस्थांशी ‘चाय पे चर्चा‘, म्हणाले…

महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांच्या कामावरही प्रश्नचिन्ह

शासनाने नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांवर दिली आहे. मेडिकलमध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आले आहे. या जवानांचे वेतन व इतर कामांवर प्रत्येक महिन्याला कोट्यावधींचा खर्च होतो. त्यानंतरही येथे चक्क डॉक्टरांचेच वाहन चोरला जात असल्याने या जवानांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आणखी वाचा-“उत्तर नागपुरातील उड्डाण पूल बांधकामाचे चुकीचे नियोजन,” नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरमचा आक्षेप

२४ तास निरीक्षण गरजेचे

मेडिकल रुग्णालय आणि महाविद्यालयातील बहुतांश भागात प्रशासनाकडून मोठ्या संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. परंतु या कॅमेरांवर २४ तासत निरीक्षण करण्यात येत नाही. त्यामुळे चोरी झाली अथवा एखादी अनुचित घटना घडल्यावर सीसीटीव्ही फुटेज काढून घटनेचे वास्तव बघितले जाते. परंतु प्रत्यक्षात येथे चोरी अथवा अनुचित घटना टाळण्यासाठी सतत ससीटीव्ही कॅमेराच्या मदतीने प्रत्येक भागाचे निरीक्षण गरजेचे आहे. तेव्हाच येथील अनुचित घटना टळणे शक्य असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.