गोंदिया: गोंदिया जिल्ह्यांत पाऊसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने आणि अनंत चतुर्दशी, ईद- ए – मिलाद, सप्तहांत ची सुट्टी असल्यामुळे जिल्ह्यातील धरणावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे. देवरी तालुक्यातील पुजारीटोला- कालिसराड धरणात पाणी साठ्यात भरमसाठ वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे ही नैसर्गिक छटा , मनोहारी दृश्ये बघण्याकरिता पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र सुरक्षा रक्षकां अभावी या धरणांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. जिल्ह्याची तहान भागवणारे पुजारीटोला -कालिसराड धरण सध्या संकटात सापडले आहे.

हेही वाचा… बुलढाणा: गणेश विसर्जनदरम्यान भाविक तलावात बुडाला!

या धरण परिसरात सुरक्षा रक्षक अभावी मद्यपींचा मुक्तसंचार, असमाजिक तत्वांच्या दिवसाढवळ्या रंगणाऱ्या पार्ट्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या धरणांची देखरेख व परिसराची देखभाल करण्यासाठी सुरक्षा रक्षकच नसल्याने हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याची ओरड परिसरातील नागरिक करू लागले आहेत. सुरक्षा अभावी धरणातील पाणीसाठ्याद्वारे विषबाधेचे प्रकार सहज घडू शकतात. यासह धरण परिसरात स्वच्छता राखणे गरजेचे आहे. असे असताना गोंदिया पाटबंधारे विभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे पहावयास मिळत आहे.

हेही वाचा… शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकीसह अनेक महाविद्यालयांकडे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित; सामाजिक न्याय विभागाचे…

धरणाला गुरुवारी भेट दिली असता हे विदारक चित्र बघून धक्का बसला. या धरणातील पाण्यावर हजारो लोक आपली तहान भागवतात. या धरणावर कोणीही सुरक्षारक्षक अगर कर्मचारी नाही. सर्व ऑपरेटिंग गेटचे रूम सताड उघडे असतात. यामुळे येथे येण्यावर कोणावरही निर्बंध राहिलेले नाही. धरण परिसरात लावलेले दिवे सुद्धा चोरून नेले आहेत. तर काही नादुरुस्त पडलेले आहेत. धरणावर मद्यपींच्या पार्ट्या रंगल्याचे निदर्शनास आले . तेथे दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच ही बाब अतिशय गंभीर आहे. अशा परिस्थितीत कोणीही येऊन धरणाचे विध्वंस अगर विषबाधा सहजरीत्या करू शकतात. याबाबत योग्य ती दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे, पाहवयास मिळाले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना जीवनदान ठरणारे पुजारीटोला -कालिसराड धरण पाटबंधारे विभाग यासाठी लाखों रुपये पाणीपट्टी शेतकऱ्यांकडून वसूल करत असते.

हेही वाचा… चंद्रपूर: जिल्हा परिषदेच्या ४७५ शाळांना लागणार टाळे?

मात्र, या धरणाच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना करण्यात येत नाहीत. संबंधित गोंदिया पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यावर गंभीरपणे विचार करतील का हा प्रश्नच आहे?

सुरक्षा रक्षकामुळे पर्यटक वर्गाला सुरक्षा प्रदान होत असते परंतु, संबंधित धरणावर सुरक्षा रक्षकच नाही तर, पर्यटक आपले मनमर्जी पणे, धरणावर कोठेही भटकत असतात. यावर अनुचित घटना घडली तर, याला जबाबदार कोण? असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होते.

सर्व धरणावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सणासुदी मुळे कदाचित… पण संबंधित अधिकाऱ्यांशी बोलुन या धरण परिसरातील सुरक्षा रक्षकांची माहिती घेतो. – राजीव कुरेकार, कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग गोंदिया

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no security guard at pujaritola and kalisrad dam in gondia sar 75 dvr
First published on: 29-09-2023 at 14:02 IST