समाजात दुर्लक्षित असलेल्या आणि आपल्या अस्तित्वासाठी शतकानुशतके लढत असलेल्या तृतीय पंथीयांनी वाद्याच्या तालावर रॅम्प वॉक करत उपस्थितांची मने जिंकली.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन निर्माण व्हावे आणि समाजात मानसन्मानाने जगता जावे, या उद्देशाने ‘पीयू मेक ओव्हर’ या संस्थेतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावर अमृत भवन येथे रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये नागपूरसह अन्य शहरातील तृतीय पंथी सहभागी झाले होते. गौरव ट्रस्टच्या अध्यक्ष तसेच तृतीय पंथी मॉडेल विजेता शनाया अशोक पखाले यांच्यासह १६ तृतीय पंथीयांनी यात सहभाग नोंदवला. 

यावेळी शनाया अशोक पखाले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, रॅम्प वॉक करायची संधी मिळाल्याने आम्ही खूप आनंदित आहोत. आम्हाला सुद्धा इतरांसारखी काही करून दाखवण्याची संधी मिळायला हवी.  तृतीयपंथींना मेकअप कौशल्य शिकण्याची संधी देण्यात येणार आहे. नामांकित मेकअप आर्टिस्टकडून मोफत मेकअप कार्यशाळा, नायरा कॉस्मेटिकतर्फे मोफत मेकअप व्हॅनेटी देण्यात येणार आहे.

यावेळी सर्वांना प्रमाणपत्र आणि विविध बक्षिसे देण्यात आली. तर याप्रसंगी मेघा कपूर, रिया ठुठेजा उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third gender people won hearts by walking the ramp organized by pu make over organization msr
First published on: 16-07-2022 at 10:40 IST