चंद्रपूर : कुठल्याही परिसरातल्या जैवविविधता आणि पर्यावरणाचे निर्देशक म्हणून पक्ष्यांना अधिक महत्त्व आहे. चंद्रपुरात जिल्ह्यात साधारणपणे ३५० प्रकारचे पक्षी आढळतात. दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील विविध जलाशयांवर हजेरी लावतात. त्यामध्ये स्थानिक पक्षी तर काही स्थलांतरित हिवाळी पक्षी आहेत. यावर्षी युरोप, मध्य आशिया, सायबेरिया, मंगोलिया आणि रशिया येथील पक्षी इरई धरण परिसरात दाखल झाले आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांचे भारतातून देशातील इतर भागात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे असे दोन प्रकार आहे. चंद्रपुरात उत्तरेकडून म्हणजेच हिमालय, काश्मीर, लडाख येथून हिवाळ्यात आपल्याकडे पक्षी येतात म्हणजे अगदी युरोप, मध्य आशिया, सायबेरिया, मंगोलिया आणि रशिया या भागांमधून येणारे पक्षीसुद्धा हिवाळ्यात बघायला मिळतात. कारण या सर्व प्रदेशांमध्ये कडाक्याची थंडी असते. ते चांगले पर्यावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिल्लांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधत हिवाळ्यात दूर अंतरावरून स्थलांतर करतात. जिल्ह्यातील विविध लहान-मोठ्या जलाशयांवर यंदा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले. हे सगळे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करीत दरवर्षी हिवाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरण परिसरात येतात. यात १२ से.मी. आकारापासून ते २ फूट उंचीपर्यंतचे पक्षी यशस्वीरित्या स्थलांतर करतात.

Ursekarwadi, Dombivli, Skywalk staircase,
डोंबिवलीत उर्सेकरवाडीमधील स्कायवॉक जिन्याच्या पायऱ्यांवर प्रवाशांची घसरगुंडी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?

हेही वाचा…‘या’ गावात आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या अस्‍थी

धरणांमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असते. तसेच वन, उद्यान, शेतपीक आणि कुरणं आदी ठिकाणी मुबलक प्रमाणात गवत, विविध प्रकारची वनस्पती, कीटक, सरपटणारे जलचर, उभयचर यांची संख्या वाढल्याने खाद्य उपलब्ध असते. म्हणून हे हिवाळ्यात आक्टोबरनंतर यायला सुरुवात होते. त्यानंतर चार महिने मुक्काम केल्यानंतर हे पक्षी फेब्रुवारीनंतर परतीच्या प्रवासाला निघतात. तोपर्यंत इथली वन, भूप्रदेश आणि जलाशयावरच ते मुक्काम करतात.

हेही वाचा…देशभरात पूल बांधले…पण, नागपुरातील इवलाशा पूल मात्र तब्बल इतके दिवस…

हिमालय पर्वत ओलांडून भारतात दाखल

यावर्षी इरई धरण व आजूबाजूच्या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. ८००० मीटर उंचीवरून सुमारे ४००० कि.मी.चा प्रवास करत बार हेडेड गूज (पट्टकादंब हंस) चे आगमन झाले आहे. हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक पक्षी असून तो हिमालय पर्वत ओलांडून भारतात स्थलांतर करत दाखल झाला आहे. पट्टकादंब हंस हे हिमालय पार करत तिबेट, कजाकिस्तान, रशिया, मंगोलियाकडून भारतात विविध ठिकाणी स्थलांतर करून येतात. त्याची चोच केशरी पिवळसर असते. पिवळ्या रंगाचे पाय आणि त्याच्या डोक्यावर व मानेवर काळ्या पट्ट्या असतात. बार हेडेड गूज (पट्टकादंब) यांच्या रक्तामध्ये एक विशिष्ट प्रकारचा हिमोग्लोबिन असतो जो ऑक्सिजन जलद शोषण्यास सक्षम करतो, त्यांना लांब उड्डाणामध्ये मदत करतो. यावर्षी चंद्रपुरातील इरई धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बार हेडेड गूज (पट्टकादंब) या पक्ष्याचे जवळपास ३५ ते ४० पक्ष्यांचा थवा आढळून आला आहे. सोबतच रुडी शेलडक (चक्रवाक), क्वाटन टील (काणुक बदक), गडवाल (मलीन बदक),नो्र्दन पिन्टेल (तलवार बदक), गार्गेनी (भुवयी बदक), कोम्ब (नकटा बदक), क्आमन टिल (चक्राग बदक) व रेड क्रिस्टेट पोचार्ड (मोठी लालसरी) हे पक्षीही आढळून आले आहेत. मोठी लालसरी आणि काणुक बदक ही मोठ्या संख्येने आढळून आले आहे, अशी माहिती शुभम संजय आत्राम (पक्षी संशोधक अभ्यासक, प्राणिशास्त्र) यांनी दिली. ते सध्या प्राणिशास्त्र विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. नरेंद्र व्ही. हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी संशोधनाचे कार्य करीत आहे.

Story img Loader