scorecardresearch

Premium

‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ : विदेशात नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी शासनाचे सुविधा केंद्र; वाचा सविस्तर…

वर्धा इथल्या या रोजगार सुविधा केंद्राचे आज राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.

Wardha, job, abroad, maharashtra government Facilitation Center

वर्धा : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे एक नवी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेतर्फे ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रास प्रारंभ होत आहे.

हेही वाचा… कुलर ठरला किलर! विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू; आर्णी तालुक्यातील घटना

jobs in india
‘मनरेगा’साठी १२६६ कंत्राटी अभियंत्यांची भरती
job Central Government
पदवीधरांनो त्वरा करा, केंद्र सरकारच्या या विभागात ९० हजार पगाराची नोकरी, अनेक जागांवर भरती
public protest in mumbai
स्थानिक पातळीवर औषध खरेदीला मान्यता
Ajit Pawar trolled
‘त्या’ ट्विटमुळे अजित पवार ट्रोल, “शब्दांचे पक्के असणारे दादा तिकडे गेल्यापासून…”

हेही वाचा… अमरावती : घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून केली हत्या आणि स्वतःच फोन करून दिली माहिती

या केंद्रामार्फत विदेशात नोकरी करण्यास इच्छूक असलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांची नोंदणी, माहिती संकलन व त्यांचे अनुषंगिक प्रशिक्षण हे कार्यक्रम चालतील. या रोजगार सुविधा केंद्राचे आज राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. हे केंद्र नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित पहिलेच असे रोजगारपूरक केंद्र ठरणार आहे. कुशल व अकुशल उमेदवारांसाठी इतर देशांत आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देणे तसेच आंतरराष्ट्रीय सल्लागार सेवांचा लाभ देण्याचा प्रयत्न या केंद्रातून होणार आहे. भारतात कार्यरत असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय रोजगार मदत केंद्राचे या कार्यात सहकार्य मिळणार.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Those who eager to work abroad maharashtra government facilitation center in wardha starting soon pmd 64 asj

First published on: 06-09-2023 at 11:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×