लोकसत्ता टीम
नागपूर : जगविख्यात भंडारदऱ्यातील काजवा महोत्सवादरम्यान होणारा पर्यटनाचा अतिरेक काजव्यांच्या मुळावर उठला आहे. पर्यटकांचा गोंधळ, वाहनांच्या दिव्यांचा तीव्र प्रकाश यामुळे गेल्या काही वर्षात काजव्यांची संख्या वेगाने कमी होत आहे.

स्थानिकांना रोजगार मिळावा आणि काजव्यांच्या रूपातील निसर्गाचा आविष्कार लोकांना बघता यावा म्हणून अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या पायथ्याशी हा महोत्सव आयोजित केला जातो. पावसाळा सुरू होण्याआधी झाडांवर काजव्यांचा लखलखाट असतो. तो पाहण्यासाठी राज्यातून, राज्याबाहेरून आणि परदेशातूनदेखील पर्यटक याठिकाणी येतात. सुरुवातीला वनखात्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत होते. आता मात्र हुल्लडबाजी आणि मद्यपानाचा प्रकार वाढल्याच्या तक्रारी निसर्गप्रेमींनी केल्या आहेत.

Navi Mumbai, Vashi Sector 9, Park encroachment, Navi Mumbai municipal Authorities, Encroached Park Spaces in navi Mumbai, CIDCO redevelopment,Municipal Corporation, Property Department, Urban Planning, Godrej Developers,
नवी मुंबई : टॉवरच्या आडून उद्यानांवर घाला? गिळंकृत झालेली उद्याने मिळविण्यासाठी महापालिकेची धडपड
Flood, Raigad, rain, Nagothane,
अतिवृष्टीमुळे रायगडात पूरस्थिती; नागोठणे, आपटा, खोपोली परिसराला पुराचा तडाखा
Shaktipeeth Expressway, nagpur goa Shaktipeeth Expressway, Shaktipeeth Expressway facing protest, Land Acquisition in Shaktipeeth Expressway, Environmental Impact of Shaktipeeth Expressway, Financial Burden, vicharmanch article,
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील खनिजे वाहून नेण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग?
Vandalism, vehicles, boy,
पुणे : अल्पवयीनाकडून मद्याच्या नशेत वाहनांची तोडफोड, महर्षीनगर भागातील घटना
Due to heavy rains in Ulhas valley water level of Ulhas Bhatsa Bharangi Kalu rivers has increased
उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास, भातसा, भारंगी, काळू नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
Recovery of postal schemes in the name of wife fraud with account holders
पत्नीच्या नावे टपाल योजनांची वसुली, खातेदार रस्त्यावर
thane, Kolshet Bay Filling Case, Encroachment on Mangroves in Balkum, Encroachment on Mangroves in Kolshet, Forest Minister Sudhir mungantiwar, officials are in a round of inquiry, thane news
कोलशेत खाडी भरावाप्रकरणाची होणार चौकशी; वनमंत्र्यांच्या आदेशामुळे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
ash of khaparkheda thermal power plants found in kanhan river
खापरखेडा वीज केंद्राची राख कन्हान नदीत.. दूषित पाण्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात..

आणखी वाचा-वीज केंद्रातील वृक्ष करपली, कंत्राटदार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षाचा जाणून घ्या प्रताप…

मादीला आकर्षित करण्यासाठी नर काजवे प्रकाश सोडतात. ते बघून माद्या जमिनीवरील पालापाचोळा आणि रानवाटांवर बागडतात. कारण त्या उडू शकत नाहीत. मात्र, वर उडणारे काजवे पाहण्याच्या नादात पर्यटकांकडून त्यांचा चुराडा होतो. चांगले छायाचित्र यावे म्हणून कॅमेऱ्याचे फ्लॅश झाडांवर पडतात. या उजेडामुळे काजवे पळ काढतात. या अभयारण्यात अजूनही काही गावे अशी आहेत जिथे खासगी जमिनीवर तंबू ठोकून पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज ३० ते ३५ हजार पर्यटक याठिकाणी गर्दी करत आहेत. रात्री उशिरापर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे या पर्यटनावर नियंत्रण आणावे, अन्यथा हा महोत्सव बंद करावा, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा-गडचिरोली : तेंदू व्यवसाय मंदावल्याने नक्षल्यांची आर्थिक कोंडी!

महोत्सवाच्या नावावर बाजार

पर्यटनातून रोजगार मिळवणे ठीक आहे. मात्र, आता महोत्सवाच्या नावावर बाजार सुरू झाला आहे. मागच्या वर्षी देखील व्यवस्थापनाला आम्ही पत्र लिहिले होते. त्यांनी बैठक घेतली, पण बैठकीतील सूचनांची अंमलबजावणी झालीच नाही. यावर्षीदेखील आम्ही कडक मर्यादा घालण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांपासून तर प्रधान मुख्य वनसंरक्षक, जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाचे सचिव यांना पत्र दिले आहे. -अमोल जाधव, नेचर कन्झर्वेशन सोसायटी.

सर्व नियमांचे काटेकोर पालन

काजवा महोत्सवादरम्यान वनखात्याकडून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. रात्री नऊपर्यंतच पर्यटक याठिकाणी थांबू शकतात. काही पर्यटक दुरूनही येतात. विजेरी सोबत नेऊ दिली जात नाही. वाहनतळ देखील दूर असून पर्यटकांना पर्यटनस्थळापर्यंत पायीच पाठवले जाते. -डी. पडवळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारदरा.