नागपूर : मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न |Threatening to kill children Friend wife rape Woman suicide attempt crime in nagpur | Loksatta

नागपूर : मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

बलात्कार पीडित महिला मेडिकल रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहे.

नागपूर : मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
संग्रहित छायाचित्र

मुलाचा अपघात घडवून खून करण्याची धमकी देऊन युवकाने मित्राच्या पत्नीचे अपहरण करून जंगलात नेेले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला घरी सोडले. तिने घरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. बलात्कार पीडित महिला मेडिकल रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहे. ही घटना मौदा शहरात घडली. सतीश कृष्णाजी जौंजाळकर (२६) असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३४ वर्षीय महिला रवीना (काल्पनिक नाव) हिने प्रेमविवाह केला होता.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

आरोपी सतीश जौंजाळकर हा चालक असून रवीनाच्या पतीचा मित्र आहे. दोघेही मित्र असल्याने सतीश वारंवार घरी यायला लागला. यादरम्यान सतीश आणि रवीनाची मैत्री वाढली. मात्र, सतीश हा रवीनावर एकतर्फी प्रेम करायला लागला. गेल्या सहा महिन्यांपासून तो रवीनाशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, रवीना त्याला प्रतिसाद देत नव्हती. सतीश हा दारू प्यायल्यानंतर शारीरिक संबंधाची मागणी करून तिला त्रस्त करीत होता. ९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता त्याने रवीनाला फोन केला.

हेही वाचा : नागपूर : बिबट्याने प्राणीसंग्रहालयात शिरून केली काळविटाची शिकार

मुलाला अपघातात ठार मारण्याची धमकी दिली. ‘मुलाचा जीव वाचवायचा असेल तर माझ्यासोबत जंगलात यावे लागेल,’ अशी धमकी दिली. तिने घाबरून होकार दिला. सतीशने तिला रामटेक रोडवरील सुप्रभात – मिनर्वा बारच्या मागील जंगलात नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सतीश हा फरार झाला आहे.सतीशने केलेल्या कृत्याबाबत रवीनाला मानसिक धक्का बसला. तिने दुसऱ्या दिवशी पतीला सतीशने बलात्कार केल्यामुळे तणावात असल्याची माहिती दिली.

हेही वाचा : संघाच्या विरोधात मोर्चा काढणारे वामन मेश्राम आहेत कोण?

पतीने तिला धीर देत मौदा पोलीस ठाण्यात नेले. तेथे सतीशविरुद्ध तक्रार दिली. घरी आल्यानंतर अपराधीपणाची भावना तिच्या मनात येत होती. त्यामुळे तिने ११ ऑक्टोबरला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्या पतीने तिला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-10-2022 at 12:24 IST
Next Story
उपराजधानीवर पुन्हा डेंग्यूचे सावट ; आरोग्य विभागाची चिंता वाढली