अकोला : मूर्तिजापूर येथे घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना जैन धर्मीयातील महाराजांच्या तीन प्राचीन मूर्ती शुक्रवारी आढळून आल्या. त्या मूर्तींची पूजा करून सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूर्तिजापूर येथील रामेश्वर इंगोले यांच्या निवासस्थानी बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी जेसीबी यंत्राद्वारे खोदकाम करण्यात येत होते. खोदकाम सुरू असताना त्याठिकाणी दगडाच्या तीन मूर्ती आढळून आल्या आहेत. जैन धर्मातील नेमीनाथ भगवान, संभवनाथ महाराज व मुनी सुव्रतनाथ महाराज यांच्या त्या मूर्ती असल्याचा दावा केला जात आहे. त्या तिन्ही मूर्ती बाहेर काढून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते. त्यानंतर या मूर्ती पोलिसांकडे देऊन सुरक्षितस्थळी ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – राज्यातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी स्थळ निश्चित, जाणून घ्या सविस्तर..

हेही वाचा – सोन्याचे दागिने घेताय.. ‘एचयूआयडी’ क्रमांक असलेले हाॅलमार्क आवश्यक, जुन्या हाॅलमार्कच्या दागिने विक्रीवर प्रतिबंध

खोदकाम करताना प्राचीन मूर्ती आढळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. याठिकाणी पोलीस बंदोबस्तदेखील लावण्यात आला होता.

More Stories onअकोलाAkola
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three ancient idols found during excavation at murtijapur in akola ppd 88 ssb
First published on: 01-04-2023 at 09:42 IST