यवतमाळ : जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या घटना अनुक्रमे उमरखेड, बाभूळगाव आणि नेर तालुक्यात उघडकीस आल्या.

उमरखेड येथील बाळदी मार्गावर आयटीआय महाविद्यालयाच्या मागे झाडींमध्ये तरूणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. गोपाल सुधाकर मिरासे (२५, रा. बाळदी) असे मृताचे नाव आहे. १ मार्चपासून तो बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली होती. रविवारी दुपारी त्याचा मृतदेह आढळल्याने त्याचा खून झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Kolhapur
कोल्हापूर : गणपतीची मूर्ती खाली आणताना रोप वायर तुटल्याने एकाचा मृत्यू; एक जखमी
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या

हेही वाचा >>> धक्कादायक! ‌अल्पवयीन मुलीने ‘यू-ट्यूब’वर बघून स्वत:चीच केली प्रसूती, त्यानंतर बाळाला…

दुसऱ्या घटनेत बाभूळगाव येथून जवळ असलेल्या नांदूरा (पुलाचे) येथेही एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. मात्र मृताची ओळख अद्याप पटली नाही. अधिक तपास बाभूळगाव पोलीस करत आहेत. नेर तालुक्यातील यवतमाळ-अमरावती मार्गावर सोनवाढोणा येथील रोपवाटिकेजवळ एका ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. मृताच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मृताची ओळख पटविण्याचे काम लाडखेड पोलीस करीत आहेत.