scorecardresearch

Premium

गृहमंत्रांच्या जिल्ह्यात दोन दिवसांत तीन खून; कायदा व सुव्यवस्था…

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये तीन खून झाले. त्यापैकी दोन खून हे शहरी भागात तर एक खून सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत झाल्याची माहिती आहे.

Three murders Nagpur district
गृहमंत्रांच्या जिल्ह्यात दोन दिवसांत तीन खून; कायदा व सुव्यवस्था… (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये तीन खून झाले. त्यापैकी दोन खून हे शहरी भागात तर एक खून सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे येथील कायदा व सुस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संजय शंकरराव निघेकर (४५) रा. सुभाषनगर असे मृताचे नाव आहे. ते सातत्याने त्यांच्या पत्नीला मारहाण करत होते. त्यामुळे साहील हा त्यांचा मुलगा संतापला होता. बुधवारी मध्यरात्रीही संजय यांनी पत्नीला मारहाण केली. ही माहिती कळताच साहीलने चाकूने वडिलांचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली.

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis Ajit Pawar decide ratio of crores of funds through DPC
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री करणार ‘डीपीसी’च्या निधीची ‘वाटणी’?
ajit pawar in baramati politics
अजित पवारांची बारामतीमध्ये कसोटी
nagpur city, heavy rain, 00 mm rain, devendra Fadnavis, review
नागपुरात चार तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस, फडणवीसांकडून आढावा
cm eknath shinde, pachora shasan aplya dari
मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा अखेर निश्चित, मंगळवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रम

हेही वाचा – आता ‘एसबीएससी’ प्रवर्गासही घरकूल मिळणार

दुसरा खून बजाजनगर परिसरात झाला. येथे प्रेमचंद धनेश निशाद (२१) रा. ओम साईराम सोसायटी, विजयनगर या तरुणाचा खून भूपेंद्र बगमरिया (१९) याने केला. गुरुवारी जैतखांब परिसरातील गणेशोत्सव मंडळातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम होता. आरोपी या मंडळात सक्रिय होता. प्रेमचंदचे मित्र तेथे महाप्रसादासाठी गेले तेव्हा भूपेंद्रशी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे भूपेंद्र याने प्रेमचंद यांचा खून केला. या प्रकरणातही पोलिसांनी आरोपीला अटक केली.

हेही वाचा – ‘वृत्तपत्रांना जाहिराती द्या व कार्यक्रमाचे आयोजन करा’, कोण म्हणतंय असं व कारण काय? जाणून घ्या…

तिसऱ्या घटनेत २८ सप्टेंबरला सावनेर पोलीस ठाणे हद्दीत अमोल वामनराव गायकवाड (३७) यांचा खून झाला. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अंकित कडू, प्रवीण उईके, प्रभाकर कोहळे यांनी दारू पिण्यासाठी अमोल यांना पैसे मागितले व दगडाने हल्ला चढवला. त्यात अमोलचा मृत्यू झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three murders in two days in nagpur district mnb 82 ssb

First published on: 30-09-2023 at 10:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×