scorecardresearch

बुलढाणा : अपघातांची ‘समृद्धी’! शिवणा पिसानजीक भीषण अपघातात तीन ठार; मृतक नागपूरचे असल्याची माहिती

राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू ह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. आज सोमवारी झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार झाले तर तिघे जण गंभीर जायबंदी झाले. जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर लोणार या तालुक्यातुन समृद्धी महामार्ग जातो. बीबी ते शिवणी पिसा दरम्यान हा अपघात झाला. हेही वाचा >>> खळबळजनक! ऐन […]

बुलढाणा : अपघातांची ‘समृद्धी’! शिवणा पिसानजीक भीषण अपघातात तीन ठार; मृतक नागपूरचे असल्याची माहिती
समृद्धी महामार्गावरील अपघात फोटो- लोकसत्ता

राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू ह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. आज सोमवारी झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार झाले तर तिघे जण गंभीर जायबंदी झाले. जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर लोणार या तालुक्यातुन समृद्धी महामार्ग जातो. बीबी ते शिवणी पिसा दरम्यान हा अपघात झाला.

हेही वाचा >>> खळबळजनक! ऐन संक्रांतीला निर्दयी पित्याने दोन्ही मुलांना तिळगूळ ऐवजी दिले विष, स्वत:ही घेतला गळफास

औरंगाबाद येथून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच ४९ बीबीआर ६०८२ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर व एमएच ३२ सी ४४९० क्रमांकाची मारुती सुझुकीची भरवेगात धडक झाली. यात तिन प्रवासी ठार झाले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. अपघातग्रस्त वाहन दुसरबीड इंटरचेंज येथे नेण्यात आले. मृतांची नावे गौरव खरसान, सानवी सागर सोनटक्के, अंकित प्रदीप खैरकर (फ्रेन्ड्स कॉलनी नागपूर) नागपूरचे असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 18:52 IST

संबंधित बातम्या