Three patients of corona were found 94 year old patient in hospital mnb 82 ysh 95 | Loksatta

नागपूर : चिंता वाढली…! करोनाचे तीन रुग्ण आढळले, ९४ वर्षीय रुग्ण रुग्णालयात

नवीन रुग्णामध्ये सावनेरच्या एका ९४ वर्षीय वृद्ध, शहरातील ताजबाग परिसरातील ४० वर्षीय महिलेचाही समावेश आहे.

corona
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

नागपूर : नागपूर जिल्हा काही दिवस करोनामुक्त राहिला असतानाच गेल्या तीन दिवसांत शहरात २ आणि ग्रामीणला १ असे एकूण तीन नवीन करोनाचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यापैकी एक ९४ वर्षीय रुग्ण हा रुग्णालयात दाखल आहे. नवीन रुग्णामध्ये सावनेरच्या एका ९४ वर्षीय वृद्ध, शहरातील ताजबाग परिसरातील ४० वर्षीय महिलेचाही समावेश आहे. दोघांचाही विदेशी प्रवासाचा इतिहास नाही. तर एका रुग्णाने करोना प्रतिबंधक लस घेतली असून इतर रुग्णांची माहिती काढण्याचे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहे.

वय जास्त असल्याने एका रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या तिन्ही रुग्णाच्या संपर्कातील रुग्णांचेही नमुने करोना तपासणीसाठी घेण्यात आले आहे. या सगळ्यांच्या अहवालानंतर इतरांना विषाणूचे संक्रमण आहे काय? हे स्पष्ट होईल. दरम्यान नवीन रुग्णांमुळे शहरातील करोनाच्या आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ४ लाख ५ हजार ८६६, ग्रामीण १ लाख ७१ हजार ५५६, जिल्ह्याबाहेरील ९ हजार ९९६ अशी एकूण ५ लाख ८७ हजार ४१८ रुग्णांवर पोहचणार आहे. तर आजपर्यंत शहरातील ३ लाख ९९ हजार ८०२, ग्रामीण १ लाख ६८ हजार ९२७, जिल्ह्याबाहेरील ८ हजार ३२८ असे एकूण ५ लाख ७७ हजार ५७ जण करोनामुक्त झाले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 10:20 IST
Next Story
नागपूर : ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत नवीन नर्सिंग महाविद्यालय!, अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे आशा पल्लवित