scorecardresearch

पतीसोबत नाच करणाऱ्या तरुणीशी तीन युवकांनी केले अश्लील कृत्य

आरोपी तिघांनी तरुणीच्या पतीला मारहाण केली, याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

पतीसोबत नाच करणाऱ्या तरुणीशी तीन युवकांनी केले अश्लील कृत्य
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

नागपूर : सदरमधील माऊंट रोडवर असलेल्या मँकडाऊन हॉटेल अँड रेस्टॉरेंटमध्ये पतीसोबत नाच करणाऱ्या तरुणीशी तीन युवकांनी अश्लील कृत्य केले. याप्रकरणी सदर पोलिसांनी तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. २९ वर्षीय तरुणी पतीसोबत रविवारी रात्री दहा वाजता मँकडाऊन हॉटेल गेली होती.

जेवण झाल्यानंतर पतीसह नृत्य करीत असताना शेजारी नाचणारा युवक आकाश सुभाष कटारिया (२५, गवळीपुरा, सदर) आणि त्याचे दोन मित्र महिलेकडे अश्लील इशारे करीत होते. काही वेळपर्यंत तरुणीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आकाशने तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणीने पतीकडे तक्रार केली. मात्र, आरोपी तिघांनी तरुणीच्या पतीला मारहाण केली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या