अकोला जिल्ह्यात वाघ मृतावस्थेत आढळला

बार्शीटाकळी तालुक्यातील मोझरी खु.शिवारातील जंगलात मंगळवारी पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला.

tiger
( संग्रहित छायचित्र )

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील मोझरी खु.शिवारातील जंगलात मंगळवारी पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला.पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोझरी खु.शिवारात आज सकाळी एका शेतकऱ्याला वाघ मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह पिंजर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याठिकाणी पिंजरचे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक आणि डॉक्टरांचे पथकही पोहोचले. शवविच्छेदनानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण कळू शकेल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.या परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली होती. या अगोदर काही गावकऱ्यांना तो वाघ दिसल्याचीही चर्चा होती. आता वाघ मृतावस्थेत आढळल्याने गावकऱ्यांचे म्हणणे खरे ठरले आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger died in the forest mozari shivara in barshitakali taluka akola district amy

Next Story
Maharashtra Political Crisis: “…याची आम्ही वाट पाहतोय”; फडणवीस दिल्लीत असतानाच नागपूरमध्ये मुनगंटीवारांचं सूचक विधान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी