चंद्रपूर:वरोरा शहरात मागील काही दिवसापासून तसेच आनंदवन व त्या जवळील असलेल्या गावाच्या शेत शिवारात वाघीण आपल्या बछड्यासह वावरत असल्याचे दिसून येत आहे. मादी व  तिचा बछड्याला  अनेकांनी बघितले. त्यामुळे नागरिक दहशतीखाली  आहे

आनंदवनातून मजरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी मोठे मोठे झुडपे आहेत याच परिसरात मिया वाकी वन धन प्रकल्प असून यामध्ये घनदाट जंगल झाले आहे. काही वर्षांपूर्वी या परिसरात बिबट्याचे वास्तव्य होते. मागील काही दिवसापासून आनंदवन परसोडा खैरगाव परिसरातील शेत शिवारात वाघ मादी आपल्या बछड्यासह वावरात आहे. या परिसरात वाघाचे पायाचे ठसे आढळून आले असून एक छोटा पगमार्क आहे तो बछड्याचा असून बसण्या पूर्णपणे विकसित झाला आहे व तो शिकारीच्या शोधात असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदी करणार राज्यातील ‘या’ एकमेव प्रकल्पाची पायाभरणी

 वाघाचे पगमार्क आढळतात वनविभागाने या परिसरात गस्त घालने सुरू केले आहे तूर्तास वाघ मादी व बछड्याने कुठलीही शिकार केली नसल्याचे दिसून येत आहे वाघाचे पगमार्क अनेक ठिकाणी आढळले. मादी व बछडा अनेकांना दिसला.  नागरिक चांगले भयभीत झाल्याचे दिसून येत आहे सध्या शेतीचा हंगाम असून वाघ मादी व बछड्याच्या वावर असल्याने शेताच्या कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा >>>भाजप नेत्याचे स्वपक्षालाच आव्हान! म्हणाले, “उमेदवारी मिळाली नाही तरी…”

सहा कॅमेरे लावले

वाघ मादी व बछड्याच्या वावर असलेल्या परिसराची वन विभागाने तातडीने दखल घेतली असून गस्त घालने सुरू केले आहे व या परिसरात सहा कॅमेरे लावण्यात आले आहे .आनंदवन सह खैरगाव परसोडा शेत शिवारात वाघ मादी व बछड्याचे पगमार्क आढळून आले आहे वन विभाग आपल्या स्तरावर कार्यवाही करीत आहे तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी , असे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी कळवले आहे.

मुल तालुक्यात वाघाची दहशत

चंद्रपूर शहरात नुकताच बिबट्याने प्रवेश करून दहशत निर्माण केली होती. आता मुल तालुक्यात देखील वाघ व बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. या तालुक्यात आतापर्यंत चार गुरख्यांचा वाघाचे हल्ल्यात बळी गेला आहे. त्यामुळे या तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत झाले आहे.