scorecardresearch

खळबळजनक! वाघ आला आणि घराच्या अंगणातून चार वर्षीय बाळाला उचलून जंगलात घेऊन गेला

हर्षल हा घराच्या अंगणात बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास असताना तिथे वाघ आला व हर्षलला जंगलात घेऊन गेला.

human tiger conflict
चार ते पाच वर्षीय बालकाला वाघ घराच्या अंगणातून उचलून जंगलात घेऊन गेला (संग्रहित छायाचित्र) ( Image – लोकसत्ता टीम )

चंद्रपूर : सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील  बोरमाळा या गावातून हर्षल संजय कारमेगे या चार ते पाच वर्षीय बालकाला वाघ घराच्या अंगणातून उचलून जंगलात घेऊन गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन खाते तथा पोलिस विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले आहे.

हेही वाचा >>> नागपूर: यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्राचा मार्ग मोकळा; राज्यातील पहिलाच प्रयोग नागपुरात

हर्षल हा घराच्या अंगणात बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास असताना तिथे वाघ आला व हर्षलला जंगलात घेऊन गेला. येथे चार ते पाच वर्ष वयोगटातील बालकाला वाघाने उचलून नेल्याची घटना आधीही घडली आहे. संजय कारमेगे यांचा मुलगा वाघाने घरासमोरून उचलून नेल्याचे सांगण्यात येत आहे. आईसमोरच वाघाने हल्ला करून उचलून नेल्याने आईने आरडाओरड केली. परंतू, वाघ बाळाला घेऊन पसार झाला. पोलीस अधिकारी तसेच वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी लगेच गावात दाखल झाले. वन अधिकारी व गावातील लोक यांच्या साह्याने बाळाचा शोध घेणे सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत बाळाचा शोध लागला नव्हता, असे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे ग्राम पंचायत सदस्य विजय कोरवार यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 10:45 IST

संबंधित बातम्या