scorecardresearch

चंद्रपूर : ब्रम्हपुरीत वाघांचा उच्छाद; आठवडाभरात घेतले चार बळी , अड्याळ शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

ब्रम्हपुरी तालुक्यात वाघांनी उच्छाद मांडला आहे. आठवडाभरात वाघांनी चार बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.

Amravati district president of PFI arrested
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

ब्रम्हपुरी तालुक्यात वाघांनी उच्छाद मांडला आहे. आठवडाभरात वाघांनी चार बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.तालुक्यातील अड्याळ शेतशिवारात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विलास विठोबा रंधये (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये मोडणाऱ्या आणि ब्रह्मपुरीपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या अड्याळ येथील मेंढाचे रहिवासी विलास रंधये त्यांच्या शेतात सुरू असलेल्या निंदन कामाची जंगलालगतच्या उंच बांधीवर उभे राहून पाहणी करीत होते. दरम्यान वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन त्यांच्या नरडीचा घोट घेतला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही आठवडाभरतील चौथी घटना आहे. या घटनेमुळे ब्रम्हपुरी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून शेत शिवारात काम करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आठवडाभरात चार बळी घेणाऱ्या वाघांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-08-2022 at 17:44 IST
ताज्या बातम्या