लोकसत्ता टीम

चंद्रपूर : सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात ‘टायगर सफारी’ सुरू करण्यात येणार आहे. यात पर्यटकांना ऑस्ट्रेलिया व न्युझीलंडचे प्राणी पाहायला मिळतील. चंद्रपुरात मूल मार्गावर सुरू होणाऱ्या या ‘टायगर सफारी’साठी प्राथमिक अभ्यास करण्याकरिता वनविभागाचे १५ अधिकारी नुकतेच सिंगापूर व दुबई दौऱ्यावर जाऊन आलेत. या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालय, पक्षी अभयारण्य, रात्र सफारी व शारजा सफारीचा अभ्यास केला.

Goregaon-Mulund Link Road, pm modi,
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प : पंतप्रधानांच्या हस्ते जुळ्या बोगद्याचे उद्या भूमिपूजन
Citizens of Dombivli West travel on gravel roads Neglect of MMRDA Public Works Department
डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांचा खडीच्या रस्त्यांवरून प्रवास; एमएमआरडीए, सार्वजनिक बांंधकाम विभागाचे दुर्लक्ष
Settlement outside Bholebaba Ashram Inspection of the incident site by Chief Minister
‘भोलेबाबा’च्या आश्रमाबाहेर बंदोबस्त; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
farmers Member of sugar factory raise Slogan against MLA Prakash Abitkar
‘बिद्री’च्या सभासदांचा भर पावसात मोर्चा;आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी
Gujarat police
गुजरातमध्ये पोलीस ठाण्यात केक कापून भाजपा नेत्याचा वाढदिवस साजरा? काँग्रेसने शेअर केलेल्या VIDEO मध्ये नेमकं काय दिसतंय?
Ultratech Company, water,
चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून ४० लाख लिटर पाण्याची चोरी, ड्रोन कॅमेऱ्यात…
two cobra jawans killed in ied blast
छत्तीसगडमध्ये स्फोटात दोन ‘कोब्रा’ जवान शहीद
supermax company, workers,
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनी कामगारांना देणी मिळण्याचा मार्ग मोकळा?

अधिकाऱ्यांचे हे पथक लवकरच राज्य सरकारला याबाबत सविस्तर अहवाल सादर करणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-मूल मार्गावरील वन अकादमी लगतच्या मोकळ्या जागेत ‘टायगर सफारी’ सुरू करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. १५० ते २०० कोटींचा हा प्रकल्प आहे. या सफरीत पर्यटक पिंजऱ्यात तर त्यांच्या आजूबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे नियोजन आहे. मार्च महिन्यात चंद्रपुरात झालेल्या ताडोबा महोत्सवात वनमंत्री मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली होती.

आणखी वाचा-ताडोबात जूनाबाई वाघिणीची दोन पिल्लांसोबत मौजमस्ती, व्हिडिओ समाज माध्यमावर सार्वत्रिक

या पार्श्वभूमीवर १३ ते १७ मे या कालावधीत सिंगापूर दौऱ्यावर गेलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, वनमंत्रालय आणि महसूल विभागाचे मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर, वनविकास महामंडळ गोरेवाडा प्राणिसंग्रहालय लि., नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी शतानिक भागवत, क्युरेटर दीपक सावंत आणि चांदा वनपरिक्षेत्राच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचा समावेश होता.

२६ मे ते २ जून या कालावधीत दुबई दौऱ्यावर गेलेल्या पथकामध्ये वन विभागाचे उपसचिव विवेक होशिंग, मंत्रालयातील विशेष कर्तव्य अधिकारी सिद्धेश सावदेकर, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौर, एफडीसीएम (नियोजन), सुमित कुमार, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय लि., नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी भागवत, गोरेवाड्याचे प्रकल्प व्यवस्थापक अर्जुन त्यागी आणि चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांचा समावेश होता. या पथकाने शारजा सफारीला भेट दिली आणि इतरही माहिती जाणून घेतली.