scorecardresearch

Premium

गडचिरोली : देसाईगंज मार्गावरून जाताय, मग सावध व्हा! चार बछड्यांसह वाघीण..

शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास देसाईगंज-आरमोरी मार्गावर वाघिणीचा चार बछड्यासह मुक्तसंचार एका प्रवाशाने कॅमेऱ्यात टिपला.

Tigeress Gadchiroli
देसाईगंज मार्गावरून जाताय, मग सावध व्हा! (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज आणि गडचिरोली वनविभागात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, रस्त्यालगत त्यांचा मुक्तसंचारदेखील वाढला आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास देसाईगंज-आरमोरी मार्गावर वाघिणीचा चार बछड्यासह मुक्तसंचार एका प्रवाशाने कॅमेऱ्यात टिपला. यामुळे देसाईगंज-आरमोरी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सावध होणे गरजेचे आहे. वाघांच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

हेही वाचा – VIDEO : बापरे! अमरावतीत विद्यार्थ्यांनी भरलेली ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटली; २२ जण जखमी

samruddhi mahamarg close for five days
समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असाल, तर ही बातमी वाचा; महिन्याभरात ‘या’ ५ दिवशी राहणार बंद!
tigers near Vairagad village
अबब… तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ, बघा व्हिडीओ
traffic, Ganeshotsav the highway is blocked again due to Pune Mumbai passengers
सातारा:गणेशोत्सवानंतर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्यांमुळे महामार्ग पुन्हा ठप्प
kashedi tunnel open for ganpati
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचे अडथळे दूर, कोकणवासीयांना दिलासा; कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू

हेही वाचा – यवतमाळ: ऐन परीक्षेच्या काळात प्राध्यापकांचे आंदोलन; संस्थाध्यक्षांवर आर्थिक शोषणाचा आरोप

११ लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी १ या आक्रमक वाघाला जेरबंद केल्यानंतर देसाईगंज परिसरात वाघाची दहशत काही प्रमाणात कमी झाली असली तरी अधूनमधून मुख्य मार्गालगत वाघांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो. शुक्रवारीदेखील रात्रीच्या सुमारास चार पिलांसह वाघिणीला रस्ता ओलांडताना प्रवाशांनी कॅमेऱ्यात टिपले. सद्या ही चित्रफीत समाज माध्यमावर चांगलीच व्हायरल झाली आहे. परिसरात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tigeress with four cubs seen on desaiganj armory road in gadchiroli ssp 89 ssb

First published on: 25-02-2023 at 14:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×