लोकसत्ता टीम

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पूर्णतः प्लास्टिक बंदी असताना बफर झोनमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा तत्सम वस्तूंशी खेळणाऱ्या वाघिणीच्या घटना नित्याच्या होत आहेत.

Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
police lathicharge on citizens thronged in Kitadi forest area to see tiger
भंडारा : वाघ पाहण्याची उत्सुकता; तुफान गर्दी अन् पोलिसांवरच …
seagulls Sindhudurg loksatta news
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागर किनारी सिगल पक्ष्यांचे आगमन
tiger video loksatta news
Video: Tiger vs Tiger… ताडोबात छोटी ताराच्या दोन बछड्यांमधे जुंपली
crocodile rescue Operation video
महाकाय मगरीचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन! व्यक्तीने मगरीचे तोंड बांधून खांद्यावर उचललं अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO
bush migratory birds have made their presence
अकोला : विदेशी ‘पाहुण्यां’ची अद्याप प्रतीक्षाच, ‘झुडुपी’ची हजेरी…
Tiger attack on Man Viral Video
‘जेव्हा मृत्यू समोर दिसतो..’ वाघानं एका झडपेत व्यक्तीचा हात फाडला; जंगलातल्या लाइव्ह घटनेचा VIDEO पाहून धक्का बसेल

मंगळवारी सायंकाळच्या सफारीत १५ महिन्याची एक मादी गमबूट सोबत खेळताना पर्यटकांनी छायाचित्र टिपले आहे. मंगळवारी संध्याकाळी सफारीदरम्यान, पर्यटकांना निमढेला पर्यटन झोनमध्ये भानुसखिंडी वाघिणीचे सुमारे १५ महिन्यांचे तीन शावक गमबूटने खेळताना दिसले.

आणखी वाचा-नागपूर: ऑनलाइन गेम्सवर बंदीसाठी जनहित याचिका

“आम्ही एका नर वाघाचे शावक रस्त्याच्या कडेला विसावताना पाहत होतो, तेव्हा अचानक एक मादी बहीण तोंडात गमबूट घेऊन जंगलाच्या आतून दिसली. ती बुटाने खेळली आणि रस्त्यावर फिरू लागली जेव्हा नर शावक बूट हिसकावून घेत होता. तर तिसरे शावकही नंतर त्यांच्यात या खेळात सहभागी झाले. “तीन खेळकर वाघाची पिल्ले पर्यटकांना भुरळ घालत असली तरी, व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक आणि रबर सामग्री आढळून येणे ही चिंतेची बाब आहे आणि उद्यान व्यवस्थापनाने यासाठी जागृत असणे हे देखील एक आवाहन आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात कोर व बफर झोनमध्ये पूर्णतः प्लास्टिक बंदी आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टीक बॉटल पासून प्लास्टिकचे कोणतेही साहित्य प्रकल्पात सफारी दरम्यान घेऊन जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. अशातच वाघिणीचे शवक गम बूट सोबत खेळत असतानाचे छायाचित्र समोर आल्याने ताडोबा व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.

Story img Loader